Narendra Modi Saam Tv
मुंबई/पुणे

PM Narendra Modi : वंदे भारत एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रात पर्यटन आणि तिर्थक्षेत्राला चालना मिळेल : नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वंदे भारत ट्रेन महाराष्ट्राला समर्पित केल्या.

साम टिव्ही ब्युरो

Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वंदे भारत ट्रेन महाराष्ट्राला समर्पित केल्या. 'वंदे भारत एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रात पर्यटन आणि तिर्थक्षेत्राला चालना मिळेल. देशात मेट्रोचा विस्तार होत आहे. तसेच नवीन विमानतळ बनवल्या जात आहे, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenrda Modi) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यानंतर वंदे भारतच्या ट्रेनच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत २ वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला. वंदे भारतच्या ट्रेनच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. ' वंदे भारत ट्रेनला समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे, असे मोदी म्हणाले. रेल्वे (Railway( क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशातील नववी आणि दहावी ट्रेन सुरू झाली आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

'आर्थिक राजधान्यांना या ट्रेन जोडल्या जाणार आहेत. मोठ्या गतीने देशात वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या. देशातील १७ राज्यातील १०८ जिल्ह्यात वंदे भारत ट्रेनने जोडले आहेत, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. वंदे भारत एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रात पर्यटन आणि तिर्थक्षेत्राला चालना मिळेल. देशात मेट्रोचा विस्तार होत आहे. तसेच नवीन विमानतळ बनवले जात आहे, असेही त्यांनी सांगितले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, तर या ५ राशींना मिळेल आर्थिक लाभ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणेशोत्सवात पुण्यात ट्रॅफिकचा मोठा बदल; लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्त्यासह 'या' मार्गांवर वाहतूक बंद

Maharashtra News Live Update: सांगली भक्तीमय वातावरणात आणि पारंपारिक खेळणी गौराईचं घरोघरी आगमन..

Modak calories: रोज मोदक खाताय? एका दिवसात किती मोदक खावेत? जाणून घ्या

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT