Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पीएम मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यामध्ये जोरदार तयारी सुरु आहे. शरद पवार आणि पीएम नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यानिमित्त एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.
पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत या अनुषंगाने १ ऑगस्ट रोजी काही बदल करण्यात आले आहेत. पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील.
वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होऊ नये याकरीता या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.