Mumbai Metro 3 Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro 3 : आजपासून मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत, कोणकोणत्या स्थानकावर थांबणार, तिकिटी किती असणार? वाचा

Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो मार्गिका-3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ३७,२७० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून मुंबईकरांना वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाची सुविधा देणार आहे.

Alisha Khedekar

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो मार्गिका-3 चे उद्घाटन होणार आहे

  • कफ परेड ते आरे दरम्यान ३३.५ किमी लांबीची पूर्णपणे भूमिगत मेट्रो सुरू होणार आहे

  • प्रकल्पाचा एकूण खर्च ₹३७,२७० कोटी असून दररोज १३ लाख प्रवासी लाभ घेतील

  • या मेट्रोमुळे दक्षिण मुंबई आणि उपनगरे यांच्यातील वाहतूक अधिक सुलभ होणार

मुंबईकरांसाठी खुशखबर! आचार्य अत्रे चौक ते कफ परेडपर्यंतच्या मुंबई मेट्रो मार्गिका -3च्या 2बी या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. . या टप्प्याचा एकूण खर्च सुमारे १२,२०० कोटी रुपये आहे. यासह, ते संपूर्ण मुंबई मेट्रो मार्गिका 3चे (अ‍ॅक्वा लाईन) राष्ट्रार्पण करणार असून याचा एकूण खर्च ३७,२७० कोटी रुपयांहून अधिक आहे.

ही मेट्रो मार्गिका शहरी वाहतूक परिवर्तनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. मुंबईची पहिली आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गिका म्हणून हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) प्रवासाची पुनर्परिभाषा करण्यासाठी सज्ज आहे, जो लाखो रहिवाशांसाठी वेगवान, अधिक कार्यक्षम आणि आधुनिक वाहतूक सेवा देणार आहे.

कफ परेड ते आरे जेव्हीएलआर पर्यंत २७ स्थानके असलेली ३३. ५ किमी लांबीची मुंबई मेट्रो मार्गिका -३ दररोज १३ लाख प्रवाशांना सेवा देईल. प्रकल्पाचा शेवटचा टप्पा २ ब दक्षिण मुंबईतील वारसा आणि सांस्कृतिक स्थळांशी, जसे की फोर्ट, काळा घोडा आणि मरीन ड्राइव्हशी, अविरत आणि सुलभ जोडणी प्रदान करेल.

तसेच मुंबई उच्च न्यायालय, मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई शेअर बाजार आणि नरिमन पॉइंट यासारख्या प्रमुख प्रशासकीय आणि आर्थिक केंद्रांपर्यंत थेट पोहोचणे शक्य करेल.रेल्वे, विमानतळ, इतर मेट्रो मार्गिका आणि मोनोरेल सेवा या आणि अशा वाहतुकीच्या इतर पर्यायांसोबत कार्यक्षम एकात्मितेची सुनिश्चित करता येईल अशा पध्‍दतीने मेट्रो मार्गिका-३ ची रचना केली गेली गेली आहे. यामुळे अगदी शेवटच्या टोकापर्यंतची संपर्क जोडणी वाढेल आणि संपूर्ण महानगरीय प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

काँग्रेस-भाजप नेत्यांमध्ये राडा, Live शो मध्ये लाथा-बुक्क्यांनी मारहाण, व्हिडिओ पाहून डोक्यावर हात माराल

Sara Arjun: रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटात झळकणारी सारा अर्जुनचा ग्लॅमर लूक व्हायरल, पाहा PHOTO

तिसऱ्या मजल्यावर गेली अन् ८वीत शिकणाऱ्या आरोहीनं उडी मारली; रक्ताच्या थारोळ्यात लेकीला पाहून वडिलांना धक्का | Jalna

Ashes 2025-26: W,W,W,W,W,W,W... स्टार्कच्या वादळात इंग्लंडची दाणादाण, फक्त १७२ धावात उडाला खुर्दा

SCROLL FOR NEXT