Pm Narendra Modi Saam Tv
मुंबई/पुणे

PM Modi in Mumbai: मुंबईत मोदी-बाळासाहेबांच्या पोस्टर्सची चर्चा; मात्र लक्षवेधी पोस्टर्स कुणी लावले कळेना

PM Modi & Balasaheb Thackeray Posters: मोदी आणि बाळासाहेबांच्या पोस्टरवर कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही.

साम टिव्ही ब्युरो

>> निवृत्ती बाबर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान मुंबईत लावण्यात आलेले काही पोस्टर्स मुंबईकरांचं लक्ष वेधून घेत आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा आजचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहेत. म्हणूनच शिवसेनेच्या (ठाकरे गट) बालेकिल्ल्यात गिरगांव येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांचे बॅनर लावण्यात आले आहेत.

या फोटोमध्ये नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे झुकलेले दिसत आहे. हे पोस्टर मुंबईतील अनेक भागात लावण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

PM Modi & Balasaheb Thackeray Posters

मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र मोदी आणि बाळासाहेबांच्या पोस्टरवर कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे हे पोस्टर्स नेमके कुणी लावले असा प्रश्न पडला आहे.

PM Modi & Balasaheb Thackeray Posters

सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरून शिवसेनेचे मुखपत्र सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. शिवसेनेने आणि मुंबई महापालिकेने केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम सुरु आहे.

काम शिवसेनेचे, मेहनत मुंबई महापालिकेची व प्रचाराच्या चिपळ्या भाजप वाजवणार, अशा शब्दात सामनातून शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह! दारुच्या नशेत कारचालकाने डिलिव्हरी बॉयला उडवले, छातीवरून चाक गेले अन्...

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Anurag Dwivedi Case: लॅम्बोर्गिनी ते थार...; युट्यूबरच्या घरी ईडीचा छापा, दुबईतील क्रूझवर लग्न केल्याने संशय वाढला

Green Chutney Potato Slices : हिरव्या चटणीचे झणझणीत आणि कुरकुरीत बटाट्याचे काप, एकदा करुनच बघा

New Year 2026 Horoscope: २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल? वाचा संपूर्ण १२ राशींचं भविष्य

SCROLL FOR NEXT