Pm Modi Mumbai Visit  Saam Tv
मुंबई/पुणे

PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदी मुंबईत आले, शिंदे-फडणवीसांनी केलं स्वागत

Pm Modi News: पंतप्रधान मोदी मुंबईत आले, शिंदे-फडणवीसांनी केलं स्वागत

Satish Kengar

PM Modi Mumbai Visit:

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई विमानतळावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर राज्यपाल रमेश बैस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. मुंबई विमानतळा बाहेरील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मुख्य रस्ता आता सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आला असून पंतप्रधान मोदी हे वांद्रे येथील कार्यक्रमासाठी रवाना झाला आहेत.

जियो वर्ल्ड सेंटर इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या 141 व्या सत्राचे उद्‌घाटन हे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी ते मुंबईत आले आहेत. हे सत्र, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सदस्यांची एक महत्वाची बैठक मानली जाते.  (Latest Marathi News)

या सत्रात ऑलिंपिक स्पर्धांच्या भविष्याशी संबंधित महत्वाचे निर्णय घेतले जातात. भारतात ही बैठक दुसऱ्यांदा होत आहे. याधीची बैठक सुमारे 40 वर्षांपूर्वी झाली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे 86 वे सत्र, नवी दिल्लीत 1983 साली झाले होते.

आता हे 141 वे सत्र भारतात होत असून, हे सत्र, जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणारे, क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तमाचा गौरव करणारे आणि मैत्री, परस्पर सन्मान, उत्कृष्टता अशा ऑलिंपिकच्या आदर्श उद्दिष्टाना अधिक बळकट करणारे असेल. हे सत्र, क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध भागधारकांना परस्पर संवाद आणि ज्ञानाची देवाण-घेवाण करण्याची संधी उपलब्ध करून देणारे ठरेल.

या सत्राला, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाच आणि इतर सदस्य उपस्थित असतील. त्याशिवाय भारतातील क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्ती आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेसह विविध क्रीडा महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना मारहाण, शरीराला अनेक फ्रॅक्चर?

Maharashtra Live News Update: जयसिंगपूरमध्ये 24 वी ऊस परिषद पार, १८ ठराव पास

BMC Election : महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला; मुंबईतून दोन उमेदवारांची केली घोषणा

Manoj Jaranage: जरांगेंचं आंदोलन ठरलं फुसका बार? तायवाडेंनी केली कुणबी प्रमाणपत्रांची पोलखोल

Ayushman Bharat Yojana: आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणकोणत्या सेवा मोफत मिळतात?

SCROLL FOR NEXT