PM Narendra Modi Saamtv
मुंबई/पुणे

PM Modi : पंतप्रधान मोदी आमदारांचा क्लास घेणार, नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करणार

PM Modi inaugurate ISKCON temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीच्या आमराचांचा क्लास घेणार आहेत. मुंबईतील नौदलाच्या आंग्रे सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदारांची बैठक होणार आहे.

Namdeo Kumbhar

PM Modi to visit Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीच्या आमराचांचा क्लास घेणार आहेत. मुंबईतील नौदलाच्या आंग्रे सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदारांची बैठक होणार आहे. तब्बल अडीच तास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुचीच्या आमदारांसोबत तब्बल अडीच तास संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात आमदारांना मोबाईल वापरण्यास बंदी असणार आहे. मोबाईल विधानभवनात ठेवत आमदारांना सभागृहात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10.30 वाजता मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे तीन प्रमुख नौदल युद्धनौका INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करतील.

तीन प्रमुख नौदल युद्धनौका -

तीन प्रमुख नौदल लढाऊ जहाजे कार्यरत करणे ही संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृष्टीकोनातून घेतलेली एक उत्तुंग झेप आहे. आयएनएस सूरत, P15B हे मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पातील चौथे आणि सर्वोत्तम जहाज असून, जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यातील 75% सामग्री स्वदेशी असून अत्याधुनिक शस्त्र-सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी ते सुसज्ज आहे. आयएनएस निलगिरी, हे P17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकारातील पहिले जहाज असून भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केली आहे. तसेच त्यात उत्कृष्टपणे संकटकाळी तगून रहाण्याची क्षमता असून सागरी सुरक्षा (सीकीपिंग) आणि स्टील्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. जे स्वदेशी फ्रिगेट्सच्या आधुनिक प्रकाराचे प्रतिबिंब दर्शवितात. आयएनएस वाघशीर, P75 स्कॉर्पीन प्रकल्पाची सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी असून,पाणबुडी बांधणीतील भारताच्या वाढत्या कौशल्याचे ती प्रतिनिधित्व करते. फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज खारघर मधील इस्कॉन मंदिराचे लोकार्पण

भारतातील तिसरं आणि राज्यातील पहिल्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराची उभारणी नवी मुंबईतील खारघर येथे करण्यात आली. या भव्य मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. श्री श्री राधा मदन मोहनजी यांचे हे भव्य मंदिर असून 9 एकर जागेत याची उभारणी करण्यात आलेय. 15 वर्षांपासून या भव्य मंदिराचे बांधकाम करण्यात येत होते. संपूर्णतः संगमरवरी दगडाने या मंदिराचे बांधकाम करण्यात आले, असून मंदिरासह भव्य म्युजियम, प्रशस्त हॉल आणि विश्रामासाठी खोल्यांची व्यवस्था या मंदिरात करण्यात आलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. देशविदेशातील भक्तगणं खारघर मध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT