Rahul Gandhi on Adani Saam Tv
मुंबई/पुणे

Rahul Gandhi On Adani: 'मोदी मोजक्याच लोकांना मदत करत आहेत', अदानींच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधानांना केलं लक्ष्य

INDIA Mumbai Meet News: 'मोदी मोजक्याच लोकांना मदत करत आहेत', अदानींच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधानांना केलं लक्ष्य

Satish Kengar

Rahul Gandhi On Adani: 'मोदी मोजक्याच लोकांना मदत करत आहेत', असं म्हणत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानी समुहावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. इंडिया आघाडीची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले आहेत की, मी काल पत्रकार परिषद घेत सांगितलं की, एका माणसासाठी पंतप्रधान काम करत आहेत. पंतप्रधान अदानींच्या चौकशीसाठी दबाव का टाकत नाही. पंतप्रधान आणि भाजप अदानींसोबत आहेत.

'इंडिया आघाडी भाजपला पराभूत करेल'

राहुल गांधी म्हणाले, देशातील 60 टक्के लोकांचं प्रतिनिधित्व इथे बसलेले करता आहेत. समन्वयक समिती कमिटी स्थापन केली आहे. त्यानंतर जागा वाटपाबाबत समिती नेमली आहे. ते म्हणाले की, इंडिया आघाडी भाजपला पराभूत करेल. एकत्र काम करणं महत्वाचं आहे. मी मीडियावर जास्त बोलू इच्छित नाही, पण लालू प्रसाद यादव चांगलं बोलले आहेत. (Latest Marathi News)

भाजप हटाव देश बचाव: लालूप्रसाद यादव

तत्पूर्वी बोलताना लालूप्रसाद यादव यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, आम्ही एक नव्हतो, याचा फटका देशाला बसला. मोदींनी याचा लाभ घेतला. आम्ही सुरुवातीपासून सांगत आलोय, भाजप हटाव देश बचाव.

ते म्हणाले, ''आम्ही सर्व एक आहोत आणि एक राहणार. राहुल गांधी यांना विश्वास देतो की, आम्ही एकजूट होऊन लढणार. जागा वाटपाबाबत लवकर निर्णय घेणार. यात वाद घालणार नाही. मोदी सरकारला हटवून दाखवणार. शरद पवार यांना देखील शुभेच्छा. आम्ही त्यांच्या सोबत आहोत, आपल्या पक्षाला मजबूत ठेवा.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT