Made In Pakistan Bedsheet Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Pune : महिलेने यात्रेतून खरेदी केली चादर; घरी जाऊन घडी उलगडताच पायाखालची जमीन सरकली, पाहा नक्की काय घडलं?

Made In Pakistan Bedsheet : पिंपरी चिंचवडमधील श्री मोरया गोसावी मंदिराजवळील यात्रेत ‘Made in Pakistan’ लेबल असलेली वस्तू विक्रीसाठी आल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Namdeo Kumbhar

गोपाल मोटगर, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

Pimpri - Chinchwad, Pune : पिंपरी-चिंचवड शहरातील श्री मोरया गोसावी मंदिराजवळ संकष्टी चतुर्थीनिमित्त भरणाऱ्या यात्रेत कथितपणे ‘मेड इन पाकिस्तान’ (Made in Pakistan) वस्तू विक्रीसाठी आल्याचा दावा एका महिलेने केला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

व्हिडिओमध्ये संबंधित महिला यात्रेतून खरेदी केलेली एक चादर दाखवत आहे. ही चादर धुतल्यानंतर तिच्या एका कोपऱ्यात लपवलेले लेबल आढळल्याचे ती सांगते. त्या लेबलवर ‘Made in Pakistan’ असा स्पष्ट उल्लेख असल्याचा दावा तिने केला आहे.

स्थानिक बाजारपेठेतील वस्तूंच्या उगमावर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर स्थानिक बाजारपेठांमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या मूळ उगमाबाबत (Source) प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यात्रेत आणि रस्त्यावरील स्टॉल्सवर विकल्या जाणाऱ्या वस्तूंची कोणतीही तपासणी होते का? असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित महिलेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. देशात पाकिस्तानी वस्तूंवर विविध प्रकारचे निर्बंध असताना, अशा वस्तू स्थानिक बाजारपेठेत पोहोचतातच कशा, असा प्रश्न तिने उपस्थित केला.

चौकशीची मागणी आणि खबरदारीचे आवाहन

दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडिओवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काहींनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर काहींनी वस्तूंच्या लेबलची पूर्ण पडताळणी करूनच अंतिम निष्कर्षावर यावे, अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी तिच्यावरील उत्पादन तपशील, उत्पादक कंपनीचे नाव आणि मूळ देश (Country of Origin) याची खात्री करावी, असे आवाहन केले जात आहे.

हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असला, तरी संबंधित वस्तू नेमकी कुठून आली, ती अधिकृतपणे आयात झाली होती की नाही, तसेच स्थानिक विक्रेत्याची यावर काय बाजू आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chronic stress effects: सतत तणाव घेण्याची सवय मेंदू आणि शरीरासाठी का ठरते धोकादायक? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Pune : पुण्यात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा सापडला ACB च्या जाळ्यात

Crime News : शिंदेसेनेच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा; गुंगीचे औषध देऊन अत्याचार, व्हिडीओ काढून केलं ब्लॅकमेल

आंबा फळांचा राजा तर राणी कोण?

SCROLL FOR NEXT