Pimpari- Chinchwad  Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpari- Chinchwad: जिममध्ये व्यायाम करताना भोवळ आली अन् खाली पडला, हार्ट अटॅकने तरुणाचा मृत्यू

Pimpri Man Dies Heart Attack In Gym: पिंपरी -चिंचवडमध्ये जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये व्यायाम करत असताना तरुणाला भोवळ आली आणि तो खाली पडला. जागीच या तरुणाचा मृत्यू झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषीत केले. या तरुणाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवडमध्ये जिममध्ये व्यायाम करताना ३७ वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मिलिंद कुलकर्णी असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने ६ महिन्यांपूर्वी जिम ज्वाइन केली होते. अधून- मधून तो जिमला जायचा. आज सकाळी नेहमीप्रमाणे तो जिमध्ये व्यायाम करण्यासाठी गेला अन् भयंकर घडलं. त्याचा जागीच मृत्यू झाला.

व्यायाम करून झाल्यानंतर मिलिंदने खाली बसल्यानंतर पाणी प्यायले. अन काही सेकंदात अचानक भोवळ येऊन तो खाली पडला. जिममधील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मिलिंद कुलकर्णीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मिलिंद कुलकर्णीच्या पत्नी डॉक्टर आहेत. मिलिंदचे वडील, भावाचा देखील अशाच प्रकारे हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. मिलिंदच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'टिकली' ड्रग्जचा विद्यार्थ्यांना विळखा, नागपूरच्या कॉलेजेसमध्ये 'LSD'चा धुमाकूळ

वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद पेटला, राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT