Pimpri Chinchwad News Saam tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad News : ५ लाख ४० हजारांचे मेफेड्रोन ड्रग्स जप्त; जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर पोलिसांची कारवाई

Pimpri Chinchwad News : पिंपरी- चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना पुणे- मुंबई महामार्गावर अज्ञात व्यक्ती मेफेड्रोन घेऊन येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल ५ लाख ४० हजारांचे मेफेड्रोन ड्रग्स जप्त केले आहे. (Pimpri Chinchwad) पिपरी- चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने हि कारवाई केली आहे.  (Maharashtra News)

पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्स तस्करी विरोधात कारवाई केली आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad Police) ठाण्याच्या हद्दीतील जुना पुणे- मुंबई महामार्गावर अज्ञात व्यक्ती मेफेड्रोन घेऊन येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत शहजाद आलाम अब्बास कुरेशी (वय ३८) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१६ लाखाचा मुद्देमाल हस्तगत 

शहजाद आलम अब्बास कुरेशी याने मेफेड्रॉन ड्रग्स मुंबईतील रिझवान चाँदीवालाकडून आणल्याचं प्राथमिक (Police) तपासात समोर आलं आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाकडून १० लाखांची महागडी चारचाकी गाडी असा एकूण १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT