Pimpri Chinchwad Saam tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad News: मनाई असताना शहरातून अवजड वाहतूक; १५ दिवसात ६ हजार वाहनांवर कारवाई

Pimpri Chinchwad : वाहतूक पोलिसांचे निर्देश डावलून मोठ्या प्रमाणात अवजड वाहन पिंपरी चिंचवड शहरात सकाळी आणि संध्याकाळी प्रवेश करत आहेत

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad : शहरातून अवजड वाहनांना काही कालावधीसाठी प्रवेश बंदी आहे. असे असताना देखील अवजड वाहन घातळी जात असल्याने वाहतुक कोंडी होत असते. यामुळे पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरिता शहर वाहतूक पोलिसांनी जवळपास  ६ हजार १७८ अवजड वाहनांवर कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

पिंपरी चिंचवड शहरात सकाळी व सायंकाळच्या वेळी अधिक वर्दळ असते. यामुळे वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांसाठी सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते नऊ वाजता दरम्यान प्रवेश बंदी केली आहे. तरी देखील वाहतूक पोलिसांचे (Traffic Police) निर्देश डावलून मोठ्या प्रमाणात अवजड वाहन पिंपरी चिंचवड शहरात सकाळी आणि संध्याकाळी प्रवेश करत आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडी आणि वाहन अपघातासारख्या दुर्घटना देखील घडत आहेत. मनाई असताना अवजड वाहन शहरात प्रवेश करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा पोलिसांनी उचलला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंधरा दिवसात मोठी कारवाई 

प्रामुख्याने शहरात सकाळी व सायंकाळी वाहनांची अधिक वर्दळ असल्याने वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. मागील पंधरा दिवसात अर्थात १६ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर याकालावधीत वाहतूक पोलिसांनी ६ हजार १७८ अवजड वाहनांवर कारवाई करत ६१ लाख ७१ हजार रुपये इतका दंड आकारला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT