pimpri chinchwad massive fire husband wife and two sons death shocking incident Saam TV
मुंबई/पुणे

Pimpri-Chinchwad Fire: हसत्या खेळत्या कुटुंबावर काळाचा घाला; पिंपरीतल्या आगीतील मृतांची नावे समोर

Pimpri-Chinchwad Fire News: मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन लहान मुलांचा समावेश असून त्यांची नावे समोर आलेली आहे.

गोपाल मोटघरे

Pimpri-Chinchwad Fire News: पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी पहाटेच्या सुमारास एक भयानक घटना घडली. चिखली परिसरात असणाऱ्या पूर्णा नगर येथे दुकानांना भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन लहान मुलांचा समावेश असून त्यांची नावे समोर आलेली आहे. (Latest Marathi News)

चिमणाराम बेणाराम चौधरी(वय 48), नम्रता चिमणाराम चौधरी(वय 40), भावेश चिमणाराम चौधरी (वय 15) आणि सचिन चिमणाराम चौधरी(वय 13) अशी मृतांची नावे असून सदर कुटुंब हे राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची माहिती आहे.

सदर माहिती मृतांच्या नातेवाईकांकडे विचापूस केल्यानंतर मिळाली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीच्या (Pimpari Chinchwad) पूर्णानगर चिंचवड येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास एका दुकानाला आग लागली.

आगीने काही वेळेत रौद्ररूप धारण केले. ही आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये पसरली. या घटनेत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आलं. अग्निशमन विभागाच्या जवानांनी चारही जणांचे मृतदेह बाहेर काढले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veen Doghatli Hi Tutena : अखेर तो क्षण आला; समर-स्वानंदी समोरासमोर, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा

Ganesh Chaturthi 2025: चतुर्थीला कधी आहे गणेश स्थापनेचा मुहूर्त? जाणून घ्या स्थापनेची योग्य विधी

Whatsapp New Feature: तुम्हाला मिळालेली माहिती खरी की खोटी? Whatsapp देणार खात्री, जाणून घ्या नवं फिचर

Car Accident : भीषण अपघात; अनियंत्रण कार ४० फुटावरून नदीत कोसळली, तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT