pimpri chinchwad news Saam tv
मुंबई/पुणे

पुणे पुन्हा हादरले, ४ मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न; सोसायटीचा वॉचमन पोलिसांच्या ताब्यात

pimpri chinchwad news : पुणे पुन्हा हादरले आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये ४ मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी सोसायटीच्या वॉचमेनला ताब्यात घेतलं आहे.

गोपाल मोटघरे

पुण्यात पुन्हा घडला संतापजनक प्रकार

पिंपरी-चिंचवडमध्ये ४ चिमुरड्यांवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप

सुरक्षारक्षक पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील नसरापूर, पर्वतीभागातील घटना ताजी असताना पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये चार चिमुरड्यांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका सुरक्षारक्षकाने संतापजनक प्रकार केल्याचे समोर आलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत हा संतापजनक प्रकार घडला. सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका सुरक्षारक्षकानेच चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. एका १० वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे हा नराधम आता गजाआड झालाय.

मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीत शांतता असताना शुक्रवारी दुपारी आरोपी दिनेश याने १०, ८, ६ आणि ८ वर्षे वयोगटातील चार मुलींना टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो असे आमिष दाखवलं. त्यानंतर त्यांना सातव्या मजल्यावर नेलं. तिथे त्याने या मुलींशी अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केलाय.

टेरेसवरील प्रकार कोणाला सांगितला तर जिवंत मारून टाकेन, अशी धमकीही त्याने दिली होती. आरोपी सुरक्षारक्षकाच्या धमकीमुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या. मात्र, त्यातील १० वर्षांच्या एका मुलीने हिंमत न हारता घरी पोहोचताच आईला सर्व आपबिती सांगितली. पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर नराधम सुरक्षारक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

डोंबिवलीत बाप लेकीच्या नात्याला काळिमा

डोंबिवलीत मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. बाप-लेकीच्या पवित्र नात्याला धक्का देणारी धक्कादायक घटना घडली. सख्या बापाने पोटच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडाकीस आलंय. मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत संपूर्ण प्रकार घडला. या प्रकरणी नराधम बापाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT