Physical Assault On Engineer Wife Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri-Chinchwad Crime: पती हाय का हैवान! इंजिनिअर पत्नीवर मित्रांना अत्याचार करायला सांगितलं, व्हिडीओही काढला, पतीसह चौघांविरोधात गुन्हा

Physical Assault On Engineer Wife: सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेवर तिच्या पतीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने ३ जणांना वेगवेगळ्या दिवशी महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगितले.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेवर पतीसह मित्रांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पुनावळे या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडलीय. महिलेच्या पतीसह ४ जणांविरोधात रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अद्याप अटक करण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेवर तिच्या पतीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने ३ जणांना वेगवेगळ्या दिवशी महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या पतीने या लैंगिक अत्याचाराची घटना आपल्या मोबाईलमध्ये शूट केली. आरोपी पतीने व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी दिली.या व्हिडीओच्या माध्यमातून तो पीडित महिलेला छळत होता. या लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात रावेत पोलिसांनी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.

महिलेच्या पतीने आपल्या मोबाईलमध्ये लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ शूट करून घेतले असल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. विवाहित महिलेला तिचे लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पतीने तिच्यावर तीन वेगवेगळ्या जणांकडून लैंगिक अत्याचार करून घेतले. त्यानंतर आरोपीने स्वतः आपल्या पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध स्थापित केले. सप्टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधी दरम्यान पीडित महिलेसोबत हा सर्व प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रावेत पोलिस करत आहेत. या घटनेमुळे पिंपरी-चिचंवडमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT