शाळा सुरू होताच पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी कारवाई करण्यात आली.
चऱ्होली येथील रेड क्लिप स्कूलवर शिक्षण विभागाने छापा टाकला.
पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य जप्त करण्यात आले.
गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी
विदर्भ वगळता राज्यभरात आजपासून शाळेची घंटा वाजली. अनेका शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील शाळांमध्ये उत्साह, आनंद आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने आज चऱ्होली येथील रेड क्लिप स्कूल वर छापा टाकला. महापालिकेच्या शिक्षण विभागाने आज दुपारी चऱ्होली येथील रेड क्लिप स्कूल वर छापा टाकत शाळेतील शालेय पाठ्यपुस्तक आणि इतर शैक्षणिक साहित्य जप्त केली.
रेड क्लिप स्कूलमध्ये स्कूल प्रशासनाकडून NCERT पाठ्यपुस्तक ऐवजी आर स्माईल नावाने पाठ्यपुस्तकाची विक्री विद्यार्थ्यांना जास्त दराने करण्यात येत होती. या संदर्भात स्कूलच्या पीटीए कमिटीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे आणि शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार केली होती. वारंवार तक्रार येत असल्यानं आज अखेर महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेड क्लिप स्कूलमध्ये छापेमारी केली.
तेव्हा शाळेतून बेकायदेशीरपणे होणारी पाठ्यपुस्तक विक्री आणि शैक्षणिक साहित्यावर कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तक, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. रेड क्लिप स्कूलने पालकांना आर इस्माईल ची पुस्तके घेण्याची सक्ती करू नये त्याऐवजी NCERT ची पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना घेऊ द्यावी. त्यामुळे विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं आर्थिक नुकसान होणार नाही अशी मागणी पालकांनी व्यक्त केली आहे.
उन्हाळ्याच्या तब्बल दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर आजपासून शाळा सुरू झाल्या. मुंबई, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, परळी, रत्नागिरी यांसह राज्यातील विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांचे विशेष पद्धतीने स्वागत करण्यात आले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करून, गुलाबाची फुले, पेढे आणि मिठाई देत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.