Pimpri Chinchwad Girls Fights Saam TV
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये मुलींच्या गुलाबी टोळीची दहशत; भर रस्त्यात तरुणींना तुडवलं, VIDEO व्हायरल

शहरात महाविद्यालयीन मुलींच्या गुलाबी टोळीची दहशत पाहायला मिळत आहे.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad Crime News : औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत भाईगिरी करणाऱ्या गावगुंड मुलांची दहशत पाहायला मिळत होती. मात्र आता शहरात महाविद्यालयीन मुलींच्या गुलाबी टोळीची दहशत पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलींच्या या टोळीने शहरात धुमाकूळ घातला आहे. कॉलेज सुटल्यानंतर तरुणींचं हे टोळकं मुलींना मारहाण करत आहेत. या घटनेचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. (Latest Marathi News)

ज्या वयात महाविद्यालयीन (Collage) मुलींनी आपलं शैक्षणिक भविष्य घडवायला हवं, त्या वयात या मुली एकमेकांवर दगडफेक करून एकमेकांना दगडाने ठेचण्याचा प्रयत्न करत आहेत. आपआपसातल्या झालेल्या किरकोळ वादातून पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) गावातील एका महाविद्यालयीन मुली अगदी बेभान होऊन एकमेकींना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी तुडवत आहेत.

गुलाबी टोळीच्या मुली फक्त एकमेकींना मारहाणच करत नाही. तर त्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी मुलींना भररस्त्यात अडवतात आणि मारहाण करतात. काही दिवसांपूर्वी मुलींच्या या टोळक्याने एका मुलीला बेदम मारहाण केली होती. आता अशाच प्रकारचे काही व्हिडिओ (Viral Video) समोर आले आहेत.

गुलाबी टोळीच्या मुलींचे भांडण काही सजग नागरिक सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हा भांडण फक्त काही काळापुरता थांबत आहे. दुसऱ्या दिवशी परत सूड घेण्यासाठी या मुली एकमेकांना लाथा बुक्क्यांनी तुडवतात. या मुलींना आपल्या पालकांचं, महाविद्यालयाचं तसेच पोलिसांचा कुठलाही धाक दिसत नाहीये.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की भररस्त्यात कसं हे मुलींचं टोळकं इतर मुलींना मारहाण करत आहेत. आता या महाविद्यालयातील गुलाबी टोळीची दहशत मोडून काढण्यासाठी महाविद्यालय आणि पोलिस प्रशासन काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचं असणार आहे. नागरिक दररोज घडत असलेल्या या प्रकारामुळे त्रस्त झाले आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT