Pimpri Chinchwad Coffee Shop Police Action Saam TV
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील कॅफेवर अचानक पोलीस धडकले; तरुण-तरुणींना रंगेहाथ पकडलं, परिसरात खळबळ

Pimpri Chinchwad Coffee Shop Police Action : पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या तब्बल ७ कॉफी शॉपवर गुरुवारी (ता.१५) अचानक पोलीस धडकले. यावेळी अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आले.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या तब्बल ७ कॉफी शॉपवर गुरुवारी (ता.१५) अचानक पोलीस धडकले. यावेळी अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतलं. याप्रकरणी कॅफे चालकांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात काही कॉफी शॉपच्या नावाखाली महाविद्यालयीन तरुण-तरुणींना प्रवेश दिला जात होता. गजबजलेल्या भागात असलेल्या कॉफी शॉपच्या पाठीमागच्या खोलीत तरुण-तरुणी अश्लील कृत्य करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

यासंदर्भात छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी येळकर पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी ७ कॉफी शॉपवर (Coffee Shop) अचानक छापेमारी केली. यावेळी महाविद्यालयीन तरुण तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आले.

अश्लील चाळे करणाऱ्या या प्रेमीयुगुलांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे, काही कॅफे चालकांनी तरुण-तरुणींचा जणू एक प्रकारे लॉजसारखे वेगळे कंपार्टमेंट तयार करून दिले होते. त्यात त्यांना बसण्यासाठी विशेष सोय करून दिली होती.

कॅफेशॉप मधील प्रायव्हेट कंपार्टमेंटमध्ये बसण्यासाठी महाविद्यालयीन तरुणी-तरुणीकडून प्रत्येक तासाला २०० ते ५०० रुपये इतके शुल्क आकारले जात होते. पोलिसांनी या अश्लील कृत्याचा अड्डा उध्वस्त केला असून कारवाई करत ७ कॅफेचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT