Chinchwad society jewelry theft news Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri-Chinchwad Koita Gang: पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ, दोन घरफोड्या करून दागिने लंपास

CCTV Captures 3 Burglars Looting Jewelry: पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड येथील मंगलशिल्प सोसायटीमध्ये कोयता घेऊन 3 चोर शिरले आणि दोन घरफोड्या करून दागिने लंपास केले. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Omkar Sonawane

चिंचवड येथील मंगलशिल्प सोसायटीमध्ये 3 चोरांनी रात्री घरफोडी केली.

चोरांकडे कोयते असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते.

चोरीत दोन घरांचे दागिने लंपास झाले, पण कोणीही जखमी झाला नाही.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाढती गुन्हेगारी नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच असून पुन्हा एकदा शहरात मोठी घटना घडलीय. कोयता घेऊन 3 चोरट्यांनी सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि दोन घरफोड्या करून दागिने लंपास केले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड येथील मंगलशिल्प सोसायटीमध्ये रात्री साडे बाराच्या सुमारास कोयते घेऊन 3 चोर शिरले.

सोसायटीतील चौथ्या आणि सहाव्या मजल्यावरील घर फोडले आणि घरातील दागिने लंपास केले. सुदैवाने घरात कोणी नसल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून यामध्ये स्पष्ट दिसत आहे की, 3 चोरांपैकी दोघांकडे कोयते आहे. मात्र एकूण किती दागिन्यांची चोरी झाली हे याचा अधिक तपास पोलिस करत आहे. या घटनेने आजूबाजूच्या सोसायटीमध्ये खळबळ उडाली आहे.

पुणे शहर असो किंवा पिंपरी चिंचवडमध्ये वाढती गुन्हेगारी ही पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. गेल्या काही वर्षांपासून गोळीबार, भर रस्त्यात हत्या आणि गणपती विसर्जनच्याआधी झालेल्या खुनामुळे पुणे शहर अर्थातच शिक्षणाचे माहेरघर आहे की गुन्हेगारीचे? असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पडद्यावर साधी, खऱ्या आयुष्यात बोल्ड! 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा नवा लूक पाहून फॅन्स झाले घायाळ

Famous Artist Death: प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Maharashtra News Live Update: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Rules Change June 2026: ATM चा व्यवहार ते एलपीजी, १ जूनपासून कोणकोणते बदल होणार?

SCROLL FOR NEXT