Pimpri Chinchwad News saam tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडात माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात; संभाजीराजे छत्रपती देणार भेट

जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व सेवा व दुकान बंद ठेवण्याचा आवाहन सर्वपक्षीय संघटनांनी केले हाेते.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad News : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वारंवार केले जाणारे आक्षेपार्ह विधान थांबविण्यासाठी भाजप सोडून इतर सर्व संघटनांनी आज (गुरुवार) पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आज सकाळपासून पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) तसेच भारतीय जनता पक्षाच्या काही नेते मंडळीकडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार बेताल वक्तव्य करण्यात येत आहे. याचाच निषेध करण्यासाठी आज सर्व पक्ष आणि संघटनांनी पिंपरी चिंचवड शहर बंद पुकारला आहे. (Maharashtra News)

भाजप सोडून इतर सर्व पक्ष व संघटनांनी पुकारलेल्या बंद मध्ये आज छत्रपती संभाजीराजे भोसले हे देखील सहभागी होणार आहेत. आजच्या पिंपरी चिंचवड शहर बंद मध्ये जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व सेवा व दुकान बंद ठेवण्याचा आवाहन सर्वपक्षीय संघटनांनी केला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठेत कडेकोट पोलीस (police) बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाडेपट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेल का? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update: नीलम गोर्हे कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात दाखल

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

SCROLL FOR NEXT