Pimpari Chinchwad Hit And Run case Saam Tv News
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव कारने तरुणाला चिरडले, अपघाताचा थरकाप उडवणारा CCTV आला समोर

Pimpari Chinchwad Hit And Run case: पुणे हिट अँड रन सारखीच घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. २० वर्षांच्या कारचालकाने तरूणाला चिरडल्याची घटना घडली आहे.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पुण्यामध्ये हिट अँड रनची (Pune Hit And Run Case) घटना ताजी असतानाच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये देखील अशीच घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव कारने तरुणाला चिरडल्याची (Pimpari Chinchwad Accident) घटना घडली आहे. या अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रस्त्याच्या कडेला असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करत कार चालकाने एका तरुणाला चिरडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. त्याचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत रस्त्याच्या कडेला वस्तू विकणारा अंगद गिरी नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी वेदांत राय नावाच्या २० वर्षीय कार चालकाविरोधात भादवी कलम 304 अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी आरोपीची ब्लड टेस्ट केली नसलायची माहिती समोर आली आहे. एवढ्या रात्री अशापद्धतीने बेदरकार आणि अतिशय वेगात कार चालविण्याचे कारण काय? आरोपी चालकाला अटक करून ऐवढी साधी बाब देखील पोलिसांना का विचारावी वाटली नाही? असे अनेक प्रश्न या घटनेनं उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता हिंजवडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, पुण्याचे हिट अँड रन प्रकरण सध्या चर्चेत आहे. पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये १९ मे रोजी मध्यरात्री भरधाव पोर्शे कारने दोन जणांना चिरडले होते. या अपघातामध्ये एक तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी १७ वर्षांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसंच या मुलाचे वडील आणि आजोबांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. या आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे दोन डॉक्टर आणि एका शिपायाला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT