Wakad Police Station  Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpari Chinchwad Crime: घरी सोडतो म्हणत दुचाकीवर बसवले, अन् १२ वर्षांच्या मुलासोबत केलं भयंकर कृत्य

Wakad Police Station : आरोपीने एका १२ वर्षांच्या मुलाला दुचाकीवरून तुला तुझ्या घरी सोडतो असे सांगत त्याला दुचाकीवर बसवले. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलिस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा एकदा बाल लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. वाकड पोलिस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका १८ वर्षांच्या तरुणाने लैंगिक अत्याचार केले आहेत. या घटनेमुळे पुन्हा पिंपरी-चिंचवड शहर हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उदय मारुती लोखंडे असं १२ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. उदयने एका १२ वर्षांच्या मुलाला दुचाकीवरून तुला तुझ्या घरी सोडतो असे सांगत त्याला दुचाकीवर बसवले. त्यानंतर या मुलाला घरी न सोडता त्याला सांगवी येथील पीडब्ल्यूडी ग्राऊंडच्या एका बंद पडलेल्या खोलीत नेले.

आरोपीने गुटखा खाऊन १२ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला जीवे मारेल अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पीडित मुलाला तिथेच सोडून निघून गेला. पीडित मुलाने घरी धाव घेत घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला.

या प्रकरणात पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून घेतला. पीडित मुलाने सांगितलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी त्या रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही तपासले. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आरोपीच्या दुचाकीचा नंबर मिळाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीविरोधात वाकड पोलिस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२), ३५१ (३) आणि पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Blood Sugar: रक्तातील साखर अचानक कमी झाली तर काय खावं?

रात्री ही १ सवय लावून घ्या, काही दिवसांत होईल अशक्य वाटणारा चमत्कार

इंडिया आघाडीचा EVM हटावचा नारा, इंडिया आघाडीला हवी बॅलटवर निवडणूक

World Cup Schedule : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारताचे सामने कुणासोबत? पाकिस्तानविरोधात कधी भिडणार? A टू Z माहिती

ठाण्याच्या लेडी डॉनला वाचवतंय कोण? ठाणे बीडपेक्षा वाईट, राऊतांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT