Anand Ashram : 
मुंबई/पुणे

Anand Ashram: आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या; आनंद आश्रमाचं पावित्र्य कुणी नष्ट केलं?

Anand Ashram : ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ समोर आलाय. व्हिडिओ केदार दिघेंकडून ट्विट करण्यात आलाय. आनंद आश्रमाचं पावित्र्य नष्ट केल्याचा आरोप केदार दिघेंनी केलाय...या व्हिडिओत काही लोक ढोल वाजवताना दिसताय. तर काहीजण नोटा उधळतायत..या प्रकरणाचे तीव्र राजकीय पडसाद आता उमटलेत.

Tanmay Tillu

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झालायं..यावरून आता आनंद दिघेंचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघेंनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका करत आमचा आनंद हरपला अशी प्रतिक्रिया दिलीये.

मुळात शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघेंच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात ठाणेकरांच्या समस्या सोडविण्याचं काम केलं जायचं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिघेंचे शिष्य म्हणून ओळखले जातात. शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्ता बदलानंतर मुख्यमंत्र्यांनी याच कार्यालयातून शिवसेना पक्षाचं काम केलं. सध्या हे कार्यालय मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे ठाकरे गटाला शिंदेंवर निशाणा साधण्यासाठी आयतं कोलित मिळालंय. दिघेंचे चेले म्हणवणा-यांनी उत्तर द्याव असा टोला खासदार राऊतांनी शिंदेंना लगावलाय.

दरम्यान, गणपती विसर्जनासाठी ढोल पथकानं टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात वादन केलं. त्यावेळी त्यांच्यावर टेंभीनाका शाखाप्रमुख निखिल बुडजूडे आणि पोलिस लाईन शाखाप्रमुख नितेश पाटोळे यांनी नोटांची उधळण केली.या दोघांची थेट हकालपट्टी करण्याची ग्वाही खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीये.

ठाण्याचे आनंद दिघे. दिघेंचे ठाणे ही ओळख गेली अनेक वर्ष शिवसेनेसोबत जोडली गेली. महिलांवरील अत्याचाऱ्याला याच आनंद आश्रमात चाबकाचे फटके दिल्याचा इतिहास आहे. मात्र आनंद आश्रमात नोटा उधळून शिंदेंच्या शिवसेनेनं नवा वाद ओढावून घेतलाय. मालवण प्रकरण अजून शांत झालेलं नसताना ठाणेकरांची अस्मिता असलेल्या आनंद आश्रमातील या प्रकारानं शिंदे गटाची ऐन निवडणुकीच्या तोंडावर अडचण झालीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT