- सचिन कदम
प्रस्तावित डोलवी एमआयडीसी प्रकल्पाला पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध (pen taluka farmers opposed dolvi midc project) केला आहे. पेणच्या शेतकऱ्यांनी पेण उपविभागीय अधिकारी कार्यालयावर (प्रांत कार्यालय) मूक मोर्चा (morcha) काढत एमआयडीसी प्रकल्पाला तीव्र विराेध दर्शविला आहे. (Maharashtra News)
यावेळी आंदाेलक शेतक-यांनी डोलवी, गडब, काराव, वडखळ, बोरी येथील भूसंपादनाची अधिसूचना रद्द करावी ही प्रमुख मागणी केली. या प्रमुख मागणीसह शेतक-यांनी खा-या पाण्याने भिजलेल्या शेतीची भरपाई मिळावी अशी मागणी केली.
दरम्यान खाडीच्या बाह्य काठ्याची व अंतर्गत बांधबंधिस्तीची दुरुस्ती करावी, सरकारी जागा व खाजण तेथील ग्रामस्थांच्या विकास कामाकरीता गावठाण विस्तार, क्रिडांगण समाजमंदीर आदींसाठी राखीव ठेवा अशा देखील मागण्या आंदाेलक शेतक-यांकडून करण्यात आल्या. यावेळी आंदोलकांनी घाेषणाबाजी करीत परिसर दणाणून साेडला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.