PCMC chief engineer caught red handed taking bribe by ACB saam tv
मुंबई/पुणे

Pune : पिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीचा मोठा छापा; मुख्य अभियंता लाच घेताना जाळ्यात

PCMC Bribery Scandal : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत एसीबीने धडक कारवाई करत मुख्य अभियंताला रंगेहात ताब्यात घेतले आहे.या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Saam Tv

गोपाळ मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत थेट मुख्य अभियंता पदावरील मोठ्या अधिकाऱ्याला रंगेहात ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. प्रवीण ओंबासे असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात मोठी खांडोळी उडाली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एका ठेकेदाराला महापालिकेत हक्काचे काम मिळवून देण्यासाठी या अधिकाऱ्याने १९ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. संबंधित ठेकेदाराने याप्रकरणी एसीबीकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. तक्रारीची प्राथमिक शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज थेट पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीत सापळा रचून ही कारवाई केली.

विशेष म्हणजे, सध्या विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आणि ती अजून संपल्याचे जाहीर झालेले नाही. अशा कडक आचारसंहितेच्या काळात आणि थेट पालिकेच्या मुख्यालयात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणातील आणखी काही मोठे गौप्यस्फोट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिकेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, ११ आरोपीना आज कोर्टात हजर करण्यात आले

Money Plant : घरात मनी प्लांट ठेवताना 'या' 3 गोष्टी लक्षात ठेवाच

ठाणे पोलिस स्टेशनबाहेर शिवसैनिकांची तुफान गर्दी; दोन्ही शिवसेना एकमेकांच्या विरुद्ध; आदित्य ठाकरेही पोहोचले|VIDEO

Ratri Velchi Khanyache Fayde Kay: रोज रात्री वेलची खाल्ल्याने शरीरात होतील आश्चर्यकारक बदल! जाणून घ्या 3 जबरदस्त फायदे

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा! देशात फक्त एकच जागा मिळाली? कोण आहेत अभिजीत वंजारी, ज्यांनी वाचवली पक्षाची लाज?

SCROLL FOR NEXT