Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar: पवार साहेबच दाऊदचा माणूस असू शकतात; राणेंचा खळबळजनक दावा

'पवार साहेब नावाने मोठे झाले असले तरी मनानी मोठे नाही. त्यांनी वर्षोंनुवर्ष केलेल्या कारस्थानामुळे आज महाराष्ट्र भोगतोय.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पवार साहेबचं (Sharad Pawar) दाऊदचा माणूस असू शकतात असं ट्विट करत नारायण राणेंचे सुपुत्र भाजप नेते निलेश राणेंनी (Nilesh Rane) थेट शरद पवारांवर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांना (Nawab Malik) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केल्यापासून भाजपने त्यांच्या राजीनाम्याच्या मागणी लावून धरली आहे अशातच आज मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपने दबाव वाढवण्यास सुरुवात केली असून राजीनामा घेण्यासाठी आज आझाद मैदानात मोर्चाचं आयोजन देखील भाजपकडून करण्यात आलं आहे.

फडणवीसांकडून वारंवार मलिक हे दाऊद गँगशी जोडलेले आहेत असल्याचा आरोप करतायत आपल्या भाषणातून ते सतत मलिकांवर हल्लाबोल करत आहेत. तर भाजपवाले प्रत्येक मुस्लीम व्यक्तीचे नावं दाऊदशी जोडतात असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं होतं. मात्र आता नारायण राणेंचे सुपुत्र भाजप नेते निलेश राणेंनी थेट शरद पवारांवर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला आहे याबाबत त्यांनी ट्विट करत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

त्यांनी एका ट्विटमध्ये 'पवार साहेब नावाने मोठे झाले असले तरी मनानी मोठे नाही. त्यांनी वर्षोंवर्ष केलेल्या कारस्थानामुळे आज महाराष्ट्र भोगतोय, त्यांनी पोसलेले कीडे आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी धुडगूस घालत आहेत. पवार साहेबचं पाकिस्तानचे एजंट तर नाही ना असा संशय यायला लागला आहे. असा गंभीर आरोप करतच पवार साहेबचं दाऊदचा माणूस असू शकतात असं देखील ट्विट त्यांनी केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT