Mega Block yandex
मुंबई/पुणे

Mega Block: रविवारी प्रवाशांचा होणार खोळंबा, रेल्वेच्या 'या' मार्गांवर आज मेगा ब्लॉक

Mega Block News: १९ जानेवारी २०२५ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी उपनगरीय मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Dhanshri Shintre

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे रविवार, १९ जानेवारी २०२५ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी उपनगरीय मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या वेळेत मेगा ब्लॉक लागू होईल. यामुळे प्रवाशांना मार्ग बदलण्याची आणि वैकल्पिक पर्यायांचा वापर करण्याची सूचना रेल्वे प्रशासनाने केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्यात येईल. माटुंगा स्थानकावर या गाड्या डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि माटुंगा व मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील. परिणामी, या गाड्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाण्याच्या पुढे धावणाऱ्या जलद गाड्यांना मुलुंड स्थानकात डाऊन जलद मार्गावर वळवले जाईल. या कारणास्तव, प्रवाश्यांना उशीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी वेळेचे गणित पाहून प्रवास करण्याची सूचना रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

ठाणे येथून सकाळी ११.२५ ते दुपारी ३.२७ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकात अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान या गाड्या त्यांच्या संबंधित थांब्यांवर थांबून माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवली जातील. तसेच, ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाईल. हा ब्लॉक ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत लागू राहील. यामुळे प्रवाशांना थोडा अडचणीचा सामना करावा लागू शकतो, म्हणून त्यांनी पर्यायी मार्गांचा विचार करावा, असे रेल्वे प्रशासनाने सूचित केले आहे.

ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी, रविवार म्हणजेच आज १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत भाईंदर आणि बोरिवली स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर ४ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तरी प्रवाशांनी वेळेचे नियोजन करुन घराबाहेर पडावे.

वाशी/नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा मेगा ब्लॉक कालावधीत रद्द करण्यात येतील. ठाण्याहून वाशी/नेरूळ/पनवेलसाठी सकाळी १०.३५ ते ४.०७ पर्यंत आणि पनवेल/नेरूळ/वाशी येथून ठाण्यासाठी सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ दरम्यान सेवा रद्द असतील. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. रेल्वे प्रशासन प्रवाश्यांच्या होणाऱ्या असुविधेबद्दल खेद व्यक्त करत आहे आणि त्यांना दुसऱ्या मार्गांचा वापर करण्याचे निर्देश देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT