parandwadi, sarpanch sulbha bhote, maval news saam tv
मुंबई/पुणे

Sarpanch : सरपंचांनी गावाचा पाणी प्रश्न मिटवला; तब्बल तीन कोटी 83 लाखांचा आणला निधी, ग्रामस्थ खूष

आमदार सुनील शेळके यांच्या सहकार्यातून गावच्या विकास साधला जात आहे.

दिलीप कांबळे

Maval News : माणसात जिद्द असली तर काय करू शकते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मावळातील परांदवाडीच्या सरपंच (sarpanch) सुलभा भोते. आपल्या गावचा विकास करण्यासाठी त्या निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आणि विक्रमी मतांनी निवडून आल्या. एकच ध्यास गावचा विकास. हा ध्यास मनी धरून मावळचे (maval) आमदार सुनील शेळके यांच्या मागे तगादा लावला आणि गावाचा पाण्याचा प्रश्न मिटवला. (Maharashtra News)

सुलभाताईंनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सहकार्याने पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत तीन कोटी 83 लाख रुपये निधी आणला. महिला कुठेही कमी नाही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ते काम करत शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.

या विकासकामाचे गावाने काैतुक केले. या पाण्याच्या टाकीच भूमिपूजन करण्याकरिता शेतकरी महिलांसोबत कुलस्वामी महिला मंचचा अध्यक्ष सारिका शेळके यांच्या हस्ते आणि सुसज्य अशा नवीन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला माेठ्या संख्येने महिल उपस्थित हाेत्या. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धरी ही म्हण तंतोतंत सुलभा भोते यांनी खरी करून दाखवली अशी भावना ग्रामस्थांची (villagers) हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिसाळलेल्या कुत्र्याची राजगुरुनगर शहरात दहशत..

Hair Colour: हेअर कलर करायला आवडतं? पण शरीरावर होणारे 'हे' गंभीर परिणाम वाचाच

गाडी चालवताना अचानक हँडलमधून आवाज, पाहिलं तर आत लपलं होतं अजगराचं पिल्लू, पाहा थरारक VIDEO

Virat Kohli Retirement : विराट कोहली IPLमधूनही 'रिटायर' होणार, क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारा दावा

Mega Block : मध्य-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास? कोणत्या लोकल रद्द? वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT