Breaking; परमबीर सिंग यांच्यावर होणार निलंबनाची कारवाई Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking; परमबीर सिंग यांच्यावर होणार निलंबनाची कारवाई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंग (Parambir Singh) हे भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यामध्ये चांगलेच सापडले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंग (Parambir Singh) हे भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यामध्ये चांगलेच सापडले आहेत. परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत नंतर ते फरार झाले होते. काही दिवसाअगोदर परमबीर सिंग हे हजर झाले असून, त्यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडण्यात आली आहे.

हे देखील पहा-

त्यानंतर आता परमबीर सिंग यांच्यावर देखील कारवाई होणार असल्याचे समजत आहे. फरार असलेल्या परमबीर सिंग यांच्याविरोधामध्ये वॉरंट जारी केल्यानंतर परमबीर सिंग हे काही दिवसाअगोदर कोर्टासमोर हजर झाले होते. परमबीर सिंग यांच्यावर मुंबई मधील वेगवेळ्या पोलीस ठाण्यांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता परमबीर सिंग यांच्यावर कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यातच आता परमबीर सिंग यांना सेवेतून निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, परमबीर सिंग यांच्याविरोधात आरोपांमधून ते निर्दोष सिद्ध होईपर्यंत त्यांना निलंबित केले जाऊ शकते. त्यांच्या निलंबनासाठी आज आदेश जारी होणार आहेत.परमबीर सिंग हे अचानक गायब झाले आणि अखेर २३४ दिवसांनी ते मुंबईमध्ये परतले परमबीर सिंग हे ड्युटीवर अद्यापही हजर नाहीत आणि असे असताना देखील ते सरकारी गाडीचाच वापर करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीचा थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

IND vs SL ODI Fact Check: पहिला वनडे सामना दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार? व्हायरल सत्य

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

SCROLL FOR NEXT