Param Bir Singh : परमबीर सिंह यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 6 तास कसून चौकशी
Param Bir Singh : परमबीर सिंह यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 6 तास कसून चौकशी Saam Tv
मुंबई/पुणे

Param Bir Singh : परमबीर सिंह यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 6 तास कसून चौकशी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईची माजी पोलीस आयुक्त (Police Commissioner) परमबीर सिंग (Param Bir Singh) अखेर काल मुंबईमध्ये परतले आहेत. परमबीर सिंग काल चौकशीकरिता गुन्हे शाखेच्या (Crime Branch) कार्यालयामध्ये पोहोचले आहे. यावेळी परमबीर सिंग यांची ६ तासापेक्षा अधिक काळ चौकशी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावमध्ये नोंदवलेल्या वसुलीच्या प्रकरणामध्ये डीएसपी नीलोत्पल आणि त्यांच्या टीमने त्याची कसून चौकशी केली आहे. याप्रकरणी परमबीर सिंग यांच्याविरोधामध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. काही दिवसाअगोदर त्यांना फरार घोषित देखील करण्यात आले होते. परमबीर सिंग यांचे वकील राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आम्ही तपासामध्ये पूर्ण सहकार्य करत आहेत.

हे देखील पहा-

पोलिसांसमोर हजर झाले आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहेत. ज्याठिकाणी गरज असेल, तिथे आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करू. इतर विषात देखील पूर्ण सहकार्य करण्यात येणार आहे. परमबीर सिंग यांनी काल सांगितले आहे की, ते चंदीगडमध्ये आहेत. यानंतर त्यांनी स्वतः हुन मुंबई पोलिसांसमोर हजर होऊन तपासात मदत करणार असल्याचे सांगितले आहे. या अगोदर परमबीर सिंग यांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर त्यांच्या अटकेला स्थगिती देण्यात आली होती.

त्यावेळी त्यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले होते की, परमबीर सिंग यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये खेचले जात आहे. ज्या अधिकाऱ्यांना त्यांनी भ्रष्ट कारभाराकरिता शिक्षा केली आहे, तेच अधिकारी आज तक्रारदार बनले आहेत. परमबीर यांच्या जीवाला मुंबईमध्ये धोका आहे. यामुळे ते शहराबाहेर आहे, असेही कोर्टात त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे. त्यांच्यावर आतापर्यंत ५ गुन्हे दाखल आहेत.

राज्य सीआयडी आणि ठाणे पोलिसांनी परमबीर यांच्याविरोधामध्ये लूक आउट परिपत्रक जारी केले आहे. सिंह यांच्यावर आतापर्यंत ५ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक मुंबई, एक ठाण्यात आणि ३ प्रकरणांचा तपास राज्य सीएआय करत आहे. परमबीर सिंग यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरकारच्या गृह विभागाने ७ सदस्यीय एसआयटी टीमची स्थापना करण्यात आली आहे. या टीमचे नेतृत्व डीएसपी दर्जाचे अधिकारी करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

SCROLL FOR NEXT