परमबीर सिंग
परमबीर सिंग Saam Tv
मुंबई/पुणे

चंडिगढमध्ये ही परमबीर सिंह`नॉट रिचेबल`(व्हिडिओ)

सूरज सावंत

मुंबई : चांदिवाल समितीने माजी पोलीस Police आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh विरोधात जारी केलेल्या वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी चंडिगढला गेलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या(सीआयडी) CID पथकाला सिंग तेथील घरी सापडले नाहीत. Parambir Singh not traceable in Chandigadh

परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलिसांकडून लुक आऊट Look Out Circular सर्कुलर जारी करण्यात आले होते. त्याबाबत पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडे तपासणी केली होती. त्यात परमबीर सिंग यांच्या परदेशी प्रवासाची कोणतीही नोंद सापडलेली नाही.

अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या चांदिवाल समितीने वारंवार समन्स बजावूनही अनुपस्थित राहणा-या परमबीर सिंग यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

चांदिवाल समितीने हे वॉरंट जारी करून त्याची अंमलबजावणी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यामार्फत करण्याचे निर्देश राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले होते. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या वॉरंटी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सीआयडीच्या पथकावर सोपवली.

त्यानुसार सीआयडीचे एक पथक सिंग यांच्या संभाव्य सर्व ठिकाणांवर गेली होती. त्यात मुंबईतील मलबारहिलसह चंदीगढ येथील घरीही सीआयडीचे पथक गेले होते. मात्र दोन्ही ठिकाण परमबिर सिंह हे मिळून आले नाहीत

या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 22 सप्टेंबर रोजीआहे. त्यावेळी सीआयडीच्या अधिका-यांना वॉरंटच्या अंमलबजावणीबाबत माहिती द्यावी लागेल. सीआयडीचे पथक आणखी काही काळ तेथेच थांबणार असून त्यानंतर ते परत येईल, असेही सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही आणि तीन वेळा दंड ठोठावूनही हजेरी न लावल्याने समितीने परमबीर सिंग यांना शेवटची संधी देत 7 सप्टेंबरच्या सुनावणीला हजेरी लावण्याचे निर्देश दिले होते. तसेच त्यादिवशी हजेरी न लावल्यास वॉरंट काढण्याचा इशाराही दिला होता. पण त्यानंतरही परमबीर सिंग चांदिवाल समितीच्या सुनावणीला उपस्थित राहिले नाही. त्यामुळे अखेर समितीने याप्रकरणी परमबीर सिंग यांच्याविरोधात वॉरंट जारी केले होते.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati News: २०१४ मध्ये आपण थोडक्यात वाचलो, जानकर कमळावर लढले असते, तर सुफडा साफ झाला असता, अजित पवारांचं विधान

Hair Dye Colors : टक्कल होण्याआधी डायला करा बाय बाय; घरच्याघरी सोप्या पद्धतीने केस करा काळेभोर

Today's Marathi News Live : मोठी बातमी! जय पवार मनोज जरांगेंच्या भेटीला

Maharashtra Lok Sabha 2024: राज्यात महाविकास आघाडीला किती जागांवर यश मिळणार? विजय वडेट्टीवारांनी थेट आकडाच सांगितला

Hingoli News : वाळू माफियांची दादागिरी; मध्यरात्री तलाठ्यांच्या घरावर हल्ला, दरवाजा न तुटल्याने दोन तलठ्यांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT