Shivsena : 'आपण कारणं शोधत असतो;' शंभुराज देसाईंच्या पराभवावरती परबांचं वक्तव्य
Shivsena : 'आपण कारणं शोधत असतो;' शंभुराज देसाईंच्या पराभवावरती परबांचं वक्तव्य Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena : 'आपण कारणं शोधत असतो;' शंभुराज देसाईंच्या पराभवावरती परबांचं वक्तव्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंच्या पराभवाबाबत बोलताना ते म्हणाले, 'प्रत्येक निवडणूक काहीतरी शिकवून जाते. जेव्हा जिंकतो तेव्हा कारण बघतो. मात्र महाराष्ट्रातील जनतेनं राज्य सरकारच्या कामकाजावरती विश्वास दाखवला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या कामाची पोचपावती दिली असल्याचं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.

दरम्यान भाजपने केलेल्या टीकेवरती बोलताना परब म्हणाले, 'गेल्या पाच वर्षांचे निकाल आणि हे निकाल पाहिले तर उत्तर मिळेल, निकाल तपासून पहा कुठला पक्ष मोठा'

शेवटी कामाची पावती मिळते त्याची पावती महापालिका निवडणुकीत पण मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोकण आणि शिवसेना हे जुनं गणित आहे. कोकणी माणसाने शिवसेनेवर प्रेम केलं आहे हेच आत्ताही दिसून आलं आहे. कोकणी माणसांने शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे तर राणे प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठची करतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

तसंच महाविकास आघडी फॉर्म्युला खाली नेला तो यशस्वी झाला असही ते म्हणाले. दरम्यान गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंच्या (Shambhuraj Desai) पराभवाबाबत बोलताना ते म्हणाले, 'प्रत्येक निवडणूक काहीतरी शिकवून जाते. जेव्हा जिंकतो तेव्हा कारण बघतो, हरतो तेव्हा पण कारणं शोधत असतो असही ते म्हणाले.

हे देखील पहा -

एसटी संपाबाबत (ST Strike) बोलताना अनिल परब म्हणाले, 'आम्ही एसटी कर्मचाऱ्यांशी वारंवार बोलतोय, हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. लेबर कोर्टानेही संप बेकायदेशीर ठरवला, ज्या मागण्या मान्य करायच्या होत्या त्या केल्या. विलिनीकरणाच्या मुद्यावर समिती नेमली आहे त्याचा जो अहपाल येईल तो बंधनकारक आहे. अडवणूकीचे धोरण घेऊन कर्मचारी स्वत:चे, एसटीचे आणि जनतेचे नुकसान करतायत आंदोलन घडवणारे कामगारांचे नुकसान करतायत विलिनीकरण मिळवून देऊ असं काही जण सांगतायत, पण ते कशाच्या आधारे माहित नाही. त्यामुळे मी पुन्हा आवाहन करतोय कामावर परत या.'

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | पैज लावाल, तर मग तुरुंगात जाल! दोन मित्रांना पैज चांगलीच भावली..

Pune hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरण; 'त्या' अल्पवयीन मुलाला काय झाली शिक्षा? जाणून घ्या

Today's Marathi News Live: नवी मुंबईत या वाहनांना प्रवेश बंदी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Pune Hit and Run Case | पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे प्रताप उघड

Special Report | ..तर पक्ष फुटला असता! शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT