Panvel Karjat Railway News  AI Image
मुंबई/पुणे

Panvel - Karjat : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! पनवेल-कर्जत दुहेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात, कधी सुरु होणार? जाणून घ्या

Panvel - Karjat Railway News : पनवेल-कर्जत नव्या दुहेरी रेल्वेमार्गाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या माहितीनुसार, डिसेंबर २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असून, नवी मुंबई आणि रायगडमधील रेल्वे संपर्काला यामुळे बळ मिळणार आहे.

Alisha Khedekar

मुंबई महानगर प्रदेशातील उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या पनवेल-कर्जत नव्या रेल्वेमार्गाच्या कामाने आता अंतिम टप्पा गाठला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, या सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असून, उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत.

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत (एमयूटीपी-३) हा रेल्वेमार्ग विकसित केला जात आहे. पनवेल ते कर्जतदरम्यान २९.६ किलोमीटर लांबीचा दुहेरी मार्ग उभारण्यासाठी २ हजार ७८२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गामुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. रेल्वेमार्गाच्या बांधकामातील बहुतांश महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. प्रकल्पांतर्गत नऊ मोठे पूल, ३५ छोटे पूल, पाच रस्ते उड्डाणपूल आणि १६ रस्ते भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. पनवेल आणि कर्जत येथील रेल्वे उड्डाणपुलांची कामेही पूर्ण झाली आहेत. मार्गावरील तीनही बोगद्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

एकूण ६९.७० किलोमीटरच्या नियोजित रुळांपैकी ६८.७० किलोमीटर लांबीच्या रुळांची जोडणी पूर्ण झाली आहे. पुणे द्रुतगती मार्गाखालील भुयारी मार्गातूनही रेल्वे रुळ टाकण्यात आले आहेत. पनवेल, चौक आणि मोहापे परिसरातील रुळांशी संबंधित प्रमुख कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. नवीन पनवेल स्थानकाची इमारत वापरात आली आहे. चिखले आणि मोहापे स्थानकांच्या इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. चौक स्थानकावरील मुख्य बांधकाम पूर्ण झाले असले, तरी फलाटावरील परिसरातील काही कामे सुरू आहेत. कर्जत स्थानकात फलाट, लिफ्ट, जिने, सरकते जिने आणि अन्य प्रवासी सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर पनवेल आणि कर्जतदरम्यान प्रवासासाठी पर्यायी उपनगरीय रेल्वे मार्ग उपलब्ध होईल. परिणामी, या भागातील प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि भविष्यातील प्रवासी संख्येची गरज पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, प्रत्यक्ष रेल्वे सेवा सुरू होण्याची तारीख संबंधित यंत्रणांच्या पुढील घोषणांवर अवलंबून असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT