Vinod Tawade-Pankaja Munde Saam TV
मुंबई/पुणे

Rajyasabha Election 2024 : पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार?, राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू

प्रविण वाकचौरे

सूरज मसूरकर

Rajyasabha Election 2024 :

महाराष्ट्रात राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार अनिल देसाई, प्रकाश जावडेकर, कुमार केतकर, व्ही. मुरलीधरण, नारायण राणे आणि वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 रोजी संपत आहे. या जागांसाठी निवडणूक होणार आहे.

राज्यसभेसाठी भाजपकडून विविध नावांची चाचपणी सुरू आहे. राज्यातून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. जातीय समीकरण लक्षात घेत भाजप राज्यसभेसाठी उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विनोद तावडे यांच्या रणनितीमुळे बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्याने राज्यसभेसाठी तावडेंचे नाव आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर पंकजा मुंडे मागील अनेक दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. या निमित्ताने त्यांची नाराजीदेखील दूर करण्याच भाजपचा प्रयत्न असू शकतो. केंद्रीय नेतृत्व लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. (Latest Marathi News)

कोणत्या राज्यात किती जागा?

निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), गुजरात (4), हरियाणा (1), हिमाचल प्रदेश (1), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (5), महाराष्ट्र (6), तेलंगणा (3), उत्तर प्रदेश (10), उत्तराखंड (1), पश्चिम बंगाल (5) ओडिशा (3) आणि राजस्थान (3) या 16 राज्यांमधील 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?

निवडणुकांसाठी 8 फेब्रुवारी रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. 15 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून 16 फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. तर 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. 29 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT