Pankaja munde News  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास कोण जबाबदार? पंकजा मुंडे यांनी थेट नावच सांगितलं

Pankaja munde News : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत पंकजा मुंडे यांनी महत्वाचं भाष्य केलं. मराठा आरक्षणावरून पंकजा मुंडे यांनी थेट महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. पंकजा मुंडे यांच्या आरोपानंतर महाविकास आघाडीचे नेते काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा तिढा कायम आहे. मराठा आरक्षणावरून राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता याच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे.

बैठकीतील चर्चेवर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

पंकजा मुंडे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पंकजा मुंडे याचा भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद सुरु आहे. या दौऱ्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर मोठं भाष्य केलं आहे. 'माझ्या बैठकीत जे मी बोलले तो अंतर्गत विषय आहे. फेक नरेटिव्ह तयार करतात, लोकसभा निवडणुकीत तसंच झालं. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, याला महाविकास आघाडी जबाबदार आहे. फेक नरेटिव्हची चर्चा विरोधक करत आहेत आणि या प्रश्नावर काय उत्तर द्यावं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

महायुतीच्या जागावाटपावर पंकजा मुंडे थेट बोलल्या

महायुतीमधील जागा वाटपाविषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, 'जागावाटपाबाबक प्रमुख नेते ठरवतील. दिल्लीतील काही नेत्यांचा सर्वेक्षण झाल्यानंतर याचा निर्णय होईल. काही जागा वेगळ्या कारणासाठी ठेवल्या जातील'.

'महायुतीबाबत जागावाटपाबाबत वेगळ्या करण्यासाठी काही जागा ठेवल्या जातील. त्या संदर्भात दिल्लीत वरिष्ठ निर्णय घेतील. जागा वाटपाबाबत अडचणीचा विषय नसून चर्चेचा विषय आहे. थोडा वेळ या सर्व गोष्टींसाठी द्यावा लागेल, असे त्या पुढे म्हणाल्या.

तिसऱ्या आघाडीवर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

राज्यातील तिसऱ्या आघाडीवर भाष्य करताना मुंडे म्हणाल्या, 'मराठा-ओबीसी आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका काय, यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतात का हेही पहावं लागेल. त्यासाठी तिसऱ्या आघाडीला थोडा वेळ देऊयात'.

खडकवासला मतदारसंघातील बैठकीविषयी मुंडेंनी भाष्य केलं. 'कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी बैठका घ्याव्या लागतात. हीच कार्यकर्त्यांची तयारी असते, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: १४ लाख लाडक्या बहिणींनी eKYC केलीच नाही, महत्त्वाची अपडेट आली समोर

Crime News : कर्ज घेतल्याचा फायदा घेतला, पैसे फेडेपर्यंत महिलेवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार; कोल्हापूर हादरले

राज्यातील साडेचार लाख हेक्टर जमिनींचा प्रश्न सुटणार; देवस्थान जमिनींबाबतचा सरकारचा मोठा निर्णय

Dhurandhar : पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! बॉक्स ऑफिसवर पुन्हा येणार 'धुरंधर' चं तुफान, रणवीर सिंहच्या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट

EPFO KYC Update: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आताच हे काम करा अन्यथा मिळणार नाही PFचे पैसे

SCROLL FOR NEXT