Pali Khopoli Highway saam tv
मुंबई/पुणे

Pali-Khopoli Highway : राज्यमार्ग की खड्ड्यांचा मार्ग? पाली-खोपोली रस्त्यावर मोठा खड्डा, अपघाताची भीती

Massive Pothole on Pali Khopoli Highway Raises Accident Fears : पाली-खोपोली राज्यमार्गावरून प्रवास करत असाल तर सावधान! या मार्गावर हेदवली येथे भलामोठा खड्डा पडलाय. त्यामुळं अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

Nandkumar Joshi

  • पाली-खोपोली राज्य महामार्गाची दुरवस्था

  • हेदवली येथे मोठा खड्डा

  • अपघातांना आमंत्रण

अमित गवळे, पाली

Pali News : पाली-खोपोली राज्य महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वीच या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले होते, मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या काही वर्षांतच रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सध्या या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून, हेदवली येथे तर रस्त्याच्या कडेला मोठा आणि धोकादायक खड्डा पडला आहे, ज्यामुळे येथे कधीही मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

रात्रीच्या वेळी किंवा तुफान पाऊस सुरू असताना हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास भीषण अपघात घडू शकतो. या महामार्गावर काही ठिकाणी चक्क काँक्रिटच्या रस्त्याला डांबरीकरण करण्यात आले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य वाढत चालले असून अपघातांची मालिका देखील सुरूच आहे. फक्त हेदवलीच नव्हे, तर उंबरे गावाच्या अलीकडे, मिरकुटवाडी, गोंदाव फाटा, परळी, जांभूळपाडा, वऱ्हाड, रासळ आणि वझरोली अशा अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याच्या मधोमध काँक्रिट जाऊन त्या ठिकाणी रुंद भेगा पडल्या आहेत. यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून, अत्यंत सावधगिरीने वाहने चालवावी लागत आहेत.

स्थानिक तसेच रोज प्रवास करणाऱ्या चालकांना या खड्ड्यांचा अंदाज असतो, मात्र या मार्गावर येणाऱ्या नवीन वाहनचालकाला अचानक समोर येणाऱ्या खड्ड्यामुळे गाडीवरचे नियंत्रण ठेवणे कठीण होते. अचानक ब्रेक दाबल्यामुळे किंवा गाडी अचानक खड्ड्यात गेल्यामुळे बाचकायला होऊन सातत्याने अपघाताची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे एमएसआरडीसीने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन, केवळ वरवरची डागडुजी न करता हेदवलीसह इतर सर्व ठिकाणचे खड्डे दर्जेदार पद्धतीने बुजवावेत, जेणेकरून वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित होईल.

पाली खोपोली राज्य महामार्ग दुरवस्थेसंदर्भात एमएसआरडीसी कार्यकारी अभियंता सारंग इनामदार यांच्यासोबत बोलणे झाले असता त्यांनी सांगितले की या राज्य महामार्गाची देखभाल दुरुस्ती लवकरच करण्यात येईल. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ करण्यात येईल.

पाली-खोपोली महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम होऊन काहीच वर्षे झाली आहेत, पण रस्ता एवढ्या लवकर खराब होणे हे कामाच्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे लक्षण आहे. प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदाराने तात्काळ दखल घेऊन रस्त्याची योग्य ती डागडुजी करावी. जर प्रशासनाने यावर लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही आणि यामुळे एखादा अपघात घडला, तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत, असे मनसेचे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात खळबळ! भाजपच्या नेत्यावर अहिल्यानगरमध्ये जमावाचा जीवघेणा हल्ला; १०० जणांवर गुन्हा दाखल

Maharashtra News Live Update: शिवसेना ठाकरे पक्ष सोडून पक्षांतर केलेल्या 13 नगरसेवक आणि 4 पंचायत समिती सदस्यावर कायदेशीर कार्यवाही करणार

Nagpur Crime: राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाकडून महिलेचे लैंगिक शोषण, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग; नागपूर हादरले

Crime News: मैत्रीच्या धाग्याला रक्ताचा डाग! मित्रांमधील वादातून २७ वर्षीय तरुणाचा खून

Sugar Rates : रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड! साखरेच्या दरात घसरण, १ किलोचे आजचे दर काय? वाचा

SCROLL FOR NEXT