Palghar Shivsena
Palghar Shivsena Saam Tv
मुंबई/पुणे

पालघरमध्ये शिवसेनेला खिंडार; अनेक पदाधिकारी, नगरसेवक शिंदे गटात सामील

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पडताना दिसत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांना शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, नगरसेवक यांनी पाठिंबा दिला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत असताना, आता दुसरीकडे पालघर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातही शिवसेनेत उभी फूट पडली असून खासदार राजेंद्र गावित,आमदार श्रीनिवास वनगा, यांच्यासह पाठोपाठ आता शिवसेनेचे अनेक पदाधिकारी तसेच नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याची माहिती आहे. (Ekanath Shinde Latest News)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला असतानाच दुसरीकडे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. पालघर जिल्ह्यातील खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा यांच्यासह माजी जिल्हाप्रमुख राजेश शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. इतकंच नाही तर, जिल्ह्यातील बहुतांश नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत नगरसेवक, तसेच प्रमुख कार्यकर्ते देखील शिंदे गटात सामील झाले आहेत.

पालघर जिल्ह्यातील वसई विरार महानगरपालिकेतील 5 नगरसेवक, जिजाऊ संघटनेचे विक्रमगड नगरपंचायत 19 नगरसेवक, जिजाऊ संघटनेचे तलासरी नगरपंचायत 5 नगरसेवक आणि मोखाडा नगरपंचायतीचे तब्बल 12 नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. इतकंच नाही तर, जिल्ह्यातील वसई तालुका आणि बोईसर विभागातील प्रमुख पदाधिकारी निलेश तेंडुलकर तसेच उपजिल्हा प्रमुख नवीन दुबे, बोईसर शहर प्रमुख मुकेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य कुंदन संखे हे सुद्धा आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

पालघर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, आता पालघरमध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केली होती.

पालघर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक हा बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांना मानणारा आहे. एकनाथ शिंदे व इतर आमदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात निषेध आंदोलन केले होते. त्यावेळी राजेश शहा हे अनुपस्थित होते. तेव्हाच त्यांची हकलपट्टी करावी अशी येथील शिवसेनेची मागणी होती.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची उद्या डोंबिवलीत जाहीर सभा

Uddhav Thackeray: पंतप्रधान मोदींनी १० वर्षे देशाला फसवलं; नाशकातून उद्धव ठाकरेंनी मोदींवर डागली टीकेची तोफ

Beed Crime News | घरावर हल्ला! कारण काय तर "भाजपला मतदान केलं म्हणून..."

Narendra Modi Speech Nashik | मोदींच्या सभेत शेतकऱ्याची घोषणाबाजी, व्हिडीओ व्हायरल

Haircare Routine: केस गळती कमी करण्यासाठी झोपण्यापुर्वी 'हे' उपाय करा

SCROLL FOR NEXT