Palghar News x
मुंबई/पुणे

Palghar : मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष, शिंदेंच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल; अटक होणार का?

Palghar News : मंत्रालयामध्ये क्लार्कची नोकरी लावून देतो असे म्हणून शिंदेसेनेतील पालघर युवासेना जिल्हाप्रमुखाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Yash Shirke

  • शिंदे गटाच्या पालघर युवासेना जिल्हा प्रमुखावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

  • त्याच्यावर नोकरी लावून देण्याच्या आमिष दाखवत पैसे उकळल्याचा आरोप आहे.

  • बोईसर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.

रुपेश पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

Shivsena : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेतील जिल्हा प्रमुखाच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत तरुणांकडून पैसे उकळल्याचा आरोप जिल्हा प्रमुखावर करण्यात आला आहे. या प्रकरणी व्हाट्सअप संभाषणाचा स्क्रीनशॉट पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात नोकरी लावून देतो असे सांगून तरुणांकडून पैसे उकळण्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना पालघर जिल्हा प्रमुखावर करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा प्रमुखाच्या विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत आरोपीने ५० पेक्षा जास्त तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे.

मंत्रालयात क्लार्कची नोकरी लावून देतो असे म्हणत युवासेना जिल्हा प्रमुख सौरभ आप्पा विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे ३१६ (२), ३१८ (४) प्रमाणे फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभने तरुणांकडून दोन लाख वीस हजार रुपये उकळल्याचा आरोप होत आहे.

फिर्यादीकडून आरोपी सौरभ आणि एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव काळे यांच्या व्हाट्सअप संभाषणाचा स्क्रीनशॉट देखील पोलिसांनी देण्यात आला आहे. आतापर्यंत सौरभ आप्पाने ५० पेक्षा जास्त तरुणांना नोकरी लावून देतो असे सांगून फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

८ महिन्यांपूर्वी जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती; वर्दळीचा रस्त्यावर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या उडाल्या चिंधड्या, नेमकी कुठं घडली घटना?

Farali Chivda Recipe : नवरात्रीत उपवासाला घरीच बनवा कुरकुरीत फराळी चिवडा, रेसिपी आहे अगदी सोपी

Marathwada Floods : पाऊस थांबेना, संकट संपेना! मराठवाड्यावर पावसाचं सावट कायम, हवामान विभागाने काय इशारा दिला?

Maharashtra Politics: पुण्यात भाजपची फिल्डिंग, पण दणका देणार अजित पवार; बड्या नेत्याची होणार घरवापसी

Nashik Crime: १२ तास, २ खून, नाशिक हादरले; नागरिक दहशतीखाली, गुंडांचं पोलिसांनाच थेट आव्हान

SCROLL FOR NEXT