Pune News Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune News: भरचौकात अश्लील चाळे करणारा गौरव रात्री काय करत होता? मद्यपान अन् ड्रग्जच्या आहारी गेला होता का?

Drunk youth obscene act Pune: गौरव आणि भाग्येश दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. मात्र, याआधी दोघांनी अंमली पदार्थाचे सेवन केले होते का? याचा तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील शास्त्रीनगरमध्ये तरूणानं भरचौकात अश्लील चाळे आणि लघुशंका केल्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली. यानंतर भाग्येश ओसवालला पोलिसांनी अटक केली. तर, गौरव अहुजा कराड येथे पोलि‍सांसमोर शरण गेला आहे. घटनेच्या आदल्या दिवशी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. पण मद्यापानासोबत दोघांनी अंमली पदार्थाचे सेवन केले होते का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

अलिशान कारमधून बाहेर येत गौरवने आधी लघुशंका केली. नंतर अश्लील चाळे केले. कारमध्ये बसलेला त्याचा मित्र भाग्येश दारूची बाटली घेऊन बसलेला आहे. या दोघांवर कारवाई करण्यात आली असून, गौरवनं केलेल्या कृत्याची माफी मागितली आहे. शुक्रवारी तरूणांनी रात्रभर कोरेगाव पार्क मुंढवा रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये पार्टी केली होती. तेथील सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले आहे.

नंतर शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. व्हिडिओ समोर आल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अश्लील आणि असभ्य वर्तन करणे, मोटार वाहन कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी रहदारीला अडथळा निर्माण करणे आणि दारूबंदी कायद्यानुसार येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरव आणि त्याच्या कुटुंबाची कुंडली काढली असता, दोघं बाप लेकांची जेलवारी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आरोपींनी शुक्रवारी रात्री पबमध्ये अंमील पदार्थांचे सेवन केले होते का? याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT