Ajit pawar, Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : अजित पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; काय आहे कारण?

विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्रातील काही वाहनांवर कर्नाटकात हल्ला झाल्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तातडीने मिटवा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस सरकारकडे केली जात आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. (Maharashtra-Karnataka Border Dispute)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून सुरू असलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी अजित पवारयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांना भेटण्याची वेळ मागितल्याची माहिती आहे. आज म्हणजेच बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही वेळ मागितली असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि कर्नाटक राज्याचा सीमावाद चिघळला आहे.

महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकमध्ये सातत्याने हल्ले करण्यात येत आहे. इतकंच नाही तर बेळगाव हल्ला करण्यात आल्याने राज्यातील नेते संताप व्यक्त करत असून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच कर्नाटकने सीमाप्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली असताना, कन्नड रक्षण वेदिकेने सुद्धा महाराष्ट्राविरोधात बेळगावात मोर्चा काढला आहे. कर्नाटकाच्या या भूमिकेला महाराष्ट्राने चोख प्रत्त्युतर द्यावं अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत. (Maharashtra Politics News)

याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली असल्याची माहिती आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार आहे. त्यामुळे या दोन नेत्यांच्या भेटीमध्ये सीमावादावर काय चर्चा होते हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सीमावादावरून आमदार रोहित पवारांचा CM शिंदेंना टोला

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील वाढत्या वादावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला आहे. “वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही?, पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT