NIA investigation into 54 central government websites cyber attack 
मुंबई/पुणे

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

NIA investigation into 54 central government websites cyber attack : ऑपरेशन सिंदूरदरम्यान केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर कथित DDoS हल्ल्याच्या तपासाचे धागे पुण्याच्या जुन्नरपर्यंत पोहोचले. संशयास्पद मनी ट्रान्सफर प्रकरणी दोघांची चौकशी.

Namdeo Kumbhar

रोहिदास घाडगे, साम टीव्ही प्रतिनिधी

NIA Cyber Attack Probe : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान सरकारी वेबसाइट्सवर झालेल्या कथित सायबर हल्ल्याच्या तपासाची व्याप्ती आता पुणे जिल्ह्यातील जुन्नरपर्यंत पोहोचली आहे. जुन्नरमधील तांदूळ बाजार परिसरातील दोन जणांना संशयास्पद 'मनी ट्रान्सफर' व्यवहारांच्या चौकशीसाठी केंद्रीय तपास यंत्रणेने (NIA) ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या संदर्भात जुन्नर पोलीस ठाण्यात सध्या कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या कालावधीत केंद्र सरकारच्या तब्बल ५४ महत्त्वाच्या वेबसाइट्सवर 'DDoS' (डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस) सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. या गंभीर प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करत आहे. याच तपासाचा एक भाग म्हणून जुन्नरसह देशातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी २४ ऑगस्ट रोजी शोधमोहीम राबवण्यात आली.

तपासादरम्यान जुन्नरच्या तांदूळ बाजार परिसरातील दोन स्थानिक रहिवाशांना मनी ट्रान्सफर व्यवहारांशी संबंधित चौकशीसाठी तपास यंत्रणेने सोबत नेले आहे. मात्र, जुन्नर स्थानिक पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही.

NIA च्या या संयुक्त कारवाईदरम्यान एकूण तीन लॅपटॉप, पाच मोबाईल आणि इतर डिजिटल साहित्य जप्त करण्यात आले आहे. परंतु, यापैकी नेमके कोणते साहित्य जुन्नरमधून जप्त केले गेले, याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या दोघांचा या सायबर हल्ल्याशी नेमका काय संबंध आहे आणि त्या मनी ट्रान्सफर व्यवहारांचे धागेधोरे कुठे जोडले गेले आहेत, हे NIA च्या पुढील तपासातूनच समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भुसावळमध्ये संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

पक्ष बदलणाऱ्या खासदार- आमदारांना चाप बसणार; पक्षांतर रोखण्यासाठी कपिल सिब्बलांनी सुचवला 'मास्टरप्लॅन'

Manoj Jarange: २४ तासांत दुसऱ्यांदा पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम

Periods Pain: मासिक पाळी उशीरा येते? वेदना सहन होत नाहीत? मग PCOD नाही असू शकतो 'हा' आजार

Ganpati Naivedya Recipe : नेहमीच्या मोदकांपेक्षा वेगळं काहीतरी! गणरायासाठी बनवा स्वादिष्ट शेवयांची उकडवाटी

SCROLL FOR NEXT