Devendra Fadnavis About J. P. Nadda Statement Saam TV
मुंबई/पुणे

'महाराष्ट्रात फक्त भाजप राहणार...; जे. पी. नड्डांच्या वक्तव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण

Devendra Fadnavis About J. P. Nadda Statement | महाराष्ट्रात फक्त भाजप (BJP) राहणार आहे, बाकी सर्व पक्ष संपणार आहेत, असंही नड्डा म्हणाले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपाच राहणार असे विधान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी केले आहे. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो, तर देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील असे ते म्हणाले आहेत. महाराष्ट्रात फक्त भाजप (BJP) राहणार आहे, बाकी सर्व पक्ष संपणार आहेत, असंही नड्डा म्हणाले होते. या वक्तव्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "जे.पी.नड्डा यांनी असे कुठेही म्हटले नाही, लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करू नका" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. (Devendra Fadnavis Latest News)

हे देखील पाहा -

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राजकीय पक्षांबाबत आणि शिवसेनेबाबत केलेल्या विधानावरुन गदारोळ सुरू आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जे.पी.नड्डा यांनी असे कुठेही म्हटले नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला उद्देशून ते बोलले असावे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे. लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करू नका असंही फडणवीस म्हणाले आहेत. संजय राऊतांच्या कारवाईबाबत विचारलं असता, ते म्हणाले "कुठलीही एजन्सी कारवाई करते, तेव्हा पुराव्यांनुसार करत असते" यावर मी अधिक भाष्य करणार नाही असं म्हणत फडणवीसांनी यावर अधिक बोलण टाळलं आहे.

जेपी नड्डांच्या वक्तव्यावर नीलम गोऱ्हेंचं प्रत्युत्तर

'फक्त भाजप पक्ष राहणार असं म्हणणाऱ्यांना सांगवं अस वाटतं की, जेव्हा सायंकाळ होते तेव्हा रातकिड्याला वाटते सकाळ होत नाही पण, असं होत नाही.' असं म्हणत विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्या आज सारसबाग कॉर्नर, स्वारगेट येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार आणि अभिवादन करण्यासाठी आल्या असता माध्यामांशी बोलत होत्या.

भाजपशी (BJP) मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही. तसेच महाराष्ट्रात शिवसेनेचा (Shivsena) अंत होत असून, देशात फक्त भाजपच राहील, बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असा दावा जे.पी नड्डा यांनी केला आहे. शिवाय कोणताही राष्ट्रीय पक्ष या स्थितीत नाही जो भाजपला पराभूत करू शकेल असंही नड्डा यांनी बिहार मध्ये केलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: 'ती'ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? आत्ताच हा यशाचा मंत्र लक्षात ठेवा

Thane : आई की, हैवान? ठाण्यातील महिलेचा लेकीला अमानुष मारहाण करतानाचा Video Viral

Tomato Shave Bhaji Recipe : एक टोमॅटो अन् वाटीभर शेव, रात्रीच्या जेवणाला झटपट बनवा 'हा' पदार्थ

Ashadhi Wari: विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याला अमानुष मारहाण, पंढरपुरात सुरक्षा रक्षकांची मुजोरी|VIDEO

SCROLL FOR NEXT