महापौराची गोळ्या झाडून हत्या; हत्येमागे BJP आमदाराचं कनेक्शन?
महापौराची गोळ्या झाडून हत्या; हत्येमागे BJP आमदाराचं कनेक्शन?  Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेना शाखेसमोर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून एकाची हत्या; घटनेचा थरार कॅमेरात कैद

अजय दुधाने

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार करून एकाची हत्या व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घटना घडली आहे. तुषार गुंजाळ असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इसमाचं नाव असून व्यावसायिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना शिवाजीनगर परिसरात काल दुपारच्या सुमारास घडली.

अंबरनाथ (Ambernath) पूर्वेतील शिवाजीनगर परिसरात शिवसेना शाखेसमोर आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याठिकाणी गणेश गुंजाळ हा तरुण उभा असताना शंकर शिंदे आणि नेपाळी उर्फ थापा उर्फ रॉकी या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यावेळी गणेशला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ तुषार गुंजाळ हा तिथे आला आणि हल्लेखोरांवर प्रतिहल्ला चढवला.

यावेळी हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलातून तुषार याच्यावर एक गोळी झाडली. त्यानंतर गणेश गुंजाळ याच्यावरही गोळी झाडण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला. मात्र, पिस्तुल लॉक झाल्यानं गोळी झाडल्या गेली नाही. त्यामुळे गणेशवर चॉपरने पुन्हा हल्ला चढवत हल्लेखोर तिथून पसार झाले.

या घटनेनंतर गोळी लागलेला तुषार हा पोलीस ठाण्यात (Police Station) गेला आणि तिथून एका खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेला. मात्र, या सगळ्यात वेळ गेल्यानं त्याची प्रकृती अचानक गंभीर बनली आणि त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर गणेश हा जखमी असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या हल्ल्याला एका इमारत पाडण्याच्या कामावरून झालेल्या व्यावसायिक वादाची पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक पोलिसांची ४ पथकं रवाना झाली असून गुन्हे शाखेकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ -

शिवाजीनगर परिसरातील एका पुनर्विकास प्रकल्पात गुंजाळ बंधूंनी इमारत पाडण्याचं काम घेतलं होतं. हेच काम संजय बिराजदार उर्फ पाटील या स्थानिक गुंडालाही हवं असल्यानं या दोघांमध्ये वाद सुरू होते. याच वादातून यापूर्वी गुंजाळ बंधूंवर हल्ला करण्यासाठी १३ गुंड २८ एप्रिल रोजी अंबरनाथ शहरात एकत्र जमले होते. यात अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही समावेश होता. मात्र काही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या होत्या.

तर त्यानंतर गुरुवारी रात्री संजय पाटील याची गाडी अज्ञातांनी फोडली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनसी नोंदवण्यात आली होती. त्यानंतर संजय पाटील याने गुंजाळ याला व्हिडीओ कॉल करून धमकी दिल्याचीही माहिती गुंजाळ यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे संजय बिराजदार उर्फ पाटील याचाच हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : गोडसेंचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

Heart Attack Video: आधी डोकं धरलं, मग जमिनीवर कोसळला.. वर्क आऊट करताना युवा खेळाडूला मृत्यूने गाठलं; थरारक क्षण CCTVत कैद

Uma Ramanan Dies : तामिळ सिनेसृष्टीतला आवाज काळाच्या पडद्याआड, दिग्गज गायिकेचे निधन

Dhule Fire : लाकडाची वखार, फर्निचर गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

Mayank Yadav: मयांक यादवचं नशीब फळफळणार!BCCI मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT