Ulhasnagar Crime Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! उल्हासनगर भररस्त्यात एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला

हा हल्ला पूर्व वैमान्यस्यातून झाल्याचे बोलले जात आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर - सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उल्हासनगर (Ulhasnagar) येथील मोरया नगरी रोड वर भररस्त्यात एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो व्यक्ती जबर जखमी झाला असून त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहे.

हे देखील पाहा -

उल्हासनगर येथील कॅम क्रमांक चार येथील मोरया नगरी रोड येथून आशेळेगाव गावदेवी मंदिराजवळ संतोष चव्हाण हे रिक्षा घेऊन जात होते. तेव्हा त्याच्याच रिक्षात बसलेल्या व्यक्तीने संतोष यांच्यावर कटर नामक हत्याराने वार करू लागला. या झटापटीत संतोषची रिक्षा टेम्पोला धडकली.

तेव्हा हल्लेखोर व्यक्तीने संतोषला रिक्षातुन बाहेर काढून त्याच्यावर हत्याराने वार केले. या हल्ल्या दरम्यान जखमी आणि हल्लेखोर दोघेही रक्तबंबाळ झाल्याचे दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. जखमी संतोष वर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला पूर्व वैमान्यस्यातून झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT