Raj Thackeray On One Nation One Election Saam Tv
मुंबई/पुणे

One Nation One Election : देशात आता 'वन नेशन वन इलेक्शन'? राज ठाकरे यांनी उपस्थित केले 'हे' 4 महत्त्वाचे प्रश्न

Raj Thackeray On One Nation One Election: 'एक देश एक निवडणुकी'वरून राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला चार महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत.

Satish Kengar

केंद्रीय मंत्रिमंडळाने 'एक देश एक निवडणुकी'च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पाडली. याच बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर याची आता देशभरात चर्चा होत आहे. यावरच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

सोशल मीडिया साईट फेसबुकवर एक पोस्ट करत राज ठाकरे म्हणाले आहेत की, 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी.''

राज ठाकरेंचे केंद्राला 4 प्रश्न

सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरे यांनी एक देश एक निवडणुकी'वर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी केंद्राला विचारलं आहे की, एखाद्या राज्याची विधानसभा बरखास्त झाली अथवा सरकार कोसळला तर त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या जातील की, लोकसभेचा कार्यकाल संपायची वाट पहावी लागेल?

राज ठाकरे यांनी दुसरा प्रश्न विचारला आहे की, लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका लागल्या तर देशातील प्रत्येक निवडणुका परत होणार का? त्यांनी तिसरा प्रश्न विचारला की, वन नेशन वन इलेक्शन ठीक मात्र राज्यातील महापालिका नगरपालिका निवडणुका घ्या, जवळपास चार वर्ष लोकप्रतिनिधी नाही ते जास्त महत्त्वाचं नाही का?

राज ठाकरे यांनी चौथा प्रश्न विचारला की, स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सर्वसामान्य लोकांशी असतो, पण त्यांच्याच निवडणुका नाहीत तर सर्वसामान्य जायचे कुठे? जर निवडणुकांचे महत्त्व इतकं वाटतंय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT