Kalyan : वीज बिल कमी करून देतो म्हणत नागरिकांची फसवणूक करणारा भामटा गजाआड SaamTvNews
मुंबई/पुणे

Kalyan : वीज बिल कमी करून देतो म्हणत नागरिकांची फसवणूक करणारा भामटा गजाआड

लॉकडाऊनच्या काळात महावितरण कडून बिल घेतल गेलं नाही. मात्र, लॉकडाऊननंतर महावितरण कडून वीज बिल आकारणी सुरु झाली आणि त्यावेळी नागरिकांना भरमसाठ बिले आली होती.

प्रदीप भणगे

कल्याण : लॉकडाऊनच्या काळात महावितरण कडून बिल घेतल गेलं नाही. मात्र, लॉकडाऊननंतर महावितरण कडून वीज बिल आकारणी सुरु झाली आणि त्यावेळी नागरिकांना भरमसाठ बिले आली होती. एकीकडे लॉकडाऊनची झळ आणि दुसरीकडे भरमसाठ विज बिल आल्याने नागरिक त्रस्त झाले होते. दरम्यान महावितरणच्या कार्यलयात बिल कमी करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत होत्या.

हे देखील पहा :

याच गर्दीत एक तरुण नागरिकांना भेटला आणि त्याने ही बिले कमी करून देतो महावितरण मध्ये माझी ओळख आहे, असे सांगत जवळपास 23 जणांकडून बिल भरण्यासाठी अर्ध्यापेक्षा जास्त रक्कम घेतली. इतकेच नव्हे तर महावितरण मध्ये बिल भरयासाठी स्वतःच्या खात्याचा वापर करत चेक दिला. मात्र हा चेक बाऊंस झाल्याने महावीतरण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

तेव्हा ही बाब समोर आली की या तरुणाने अनेक जणांना बिल कमी करून देण्याचा बहाण्याने पैसे उकळून फसवले आहे. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. सात महिन्यांच्या तपासानंतर 21 साक्षीदारांची चौकशी करत पोलिसांनी आरोपी साहिल पटेल याला शोधून अटक केली आहे. आरोपी साहिलने याने अजून किती जणांना फसवले आहे, याचा ही तपास पोलीस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT