Narendra Modi Saam TV
मुंबई/पुणे

काँग्रेसचा 'मनसे' पॅटर्न; मोदींची जुनी भाषणं भोंग्यांवर लावणार

मनमोहन सिंग (Manmohan Singh) सरकार असतांना सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Mosi) महागाईवर भाषणं करत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे -

मुंबई : मोदी सरकारने आम्हाला फसवले आणि महागाईच्या जाळ्यात अडकवलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस महागाईचे भोंगे वाजवणार आहे. मनमोहन सिंग (Manmohan Singh) सरकार असतांना सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) महागाईवर भाषणं करत होते. तीच नरेंद्र मोदींची आधीची भाषणं काँग्रेस भोंग्यावरुन वाजवणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. पुण्यातून या महागाई भोंग्याची सुरुवात सुरुवात केली असून आता महाराष्ट्रभर महागाईवरचे भोंगे वाजवणार असल्याचही त्यांनी सांगितल.

आज सह्याद्रीवर संध्याकाळी ८ वाजता काँग्रेस (Congress) मंत्र्यांची बैठक घेणार असून उर्जा विभागाचे प्रश्न, लोडशेडींगची कारणे, काँग्रेसचे कॅबिनेट मंत्र्यांची भूमीका , भोंग्यांवरुन सुरु असलेल्या राजकारणावर काँग्रेसची भूमीका याबाबत आज काँग्रेस मंत्र्यांची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे देखील पहा -

तसंच येणारा काळ भ्रष्टाचारी कोण हे सांगेल, जे झोळी घेऊन फिरत होके ते आज बिर्याणीशिवाय राहत नाहीत. जे पोलखोल यात्रा करायला निघालेत ते स्वत:चीच पोलखोल करतील असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. दरम्यान, केंद्राची पापं लपवायला जे पुढाकार घेतायेत त्यांना झेड प्लस सिक्युरीटी दिली जातेय. एक ओवैसी भाजपनं तयार केला आहे. झेड प्लस सिक्युरीटी दिली गेली तर सिद्ध होईल की ते कुणासाठी काम करतात अशी टीका त्यांनी राज ठाकरेंवर केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : अकोल्यात खळबळ! एकाच प्रभागातील २५ ते ३० लोकांचे मतदार यादीतून नाव गायब

मोठी बातमी! महिलेचे मत गेले चोरीला, बोगस मतदानाचा आरोप, मुंबईच्या १४६ क्रमांच्या वॉर्डात नेमकं काय झालं?

राजकीय संघर्ष पेटला! काँग्रेस उमेदवाराचे कार्यालय जाळले, भाजपवर आरोप|VIDEO

Spa Centre : २० मुलींसोबत एकच मुलगा, स्पा सेंटरमध्ये नको तो धंदा, मसाज सर्व्हिसच्या नावाखाली...

Hidden Place In Palghar : मुंबईजवळील हे हिडन प्लेस तुम्हाला माहीती आहे का? फोटोग्राफी आणि निसर्गप्रेमींसाठी प्रसिध्द

SCROLL FOR NEXT