Mumbai E-Bike Taxi Service Launched  
मुंबई/पुणे

Good news for Mumbaikars! मुंबईत आजपासून धावणार ई-बाईक , तिकिट फक्त 15 रुपये, वाचा सविस्तर

Mumbai E-Bike Taxi Service Launched : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईत इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू झाली असून किमान भाडे फक्त १५ रुपये ठेवण्यात आले आहे. ओला, उबर आणि रॅपिडोला परवाना देण्यात आला आहे. या सेवेमुळे प्रवास स्वस्त आणि सोयीस्कर होणार आहे.

Namdeo Kumbhar

  • मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू झाली, भाडे फक्त ₹१५.

  • ओला, उबर आणि रॅपिडोला तात्पुरते परवाने देण्यात आले.

  • महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम २०२५ लागू झाले.

  • स्वस्त प्रवासामुळे लाखो प्रवाशांना मोठा फायदा होणार.

Maharashtra bike taxi rules explained : लाखो मुंबईकरांचा प्रवास आता स्वस्त अन् मस्त होणार आहे. मुंबईमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. त्यासाठी भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. १.५ किमीसाठी किमान भाडं 15 रुपये आकारलं जाणार असून, त्यापुढे प्रत्येक किलोमीटरला 10.27 रुपये प्रमाणे दर लागू होईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ही माहिती दिली आहे. How to book e-bike taxi in Mumbai

महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने सोमवारी मुंबई आणि उपनगरात बाईक टॅक्सी सेवांसाठी ओला, उबर आणि रॅपिडो यांना तात्पुरते परवाने दिलेत. अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम २०२५ मध्ये नमूद केलेल्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केल्यानंतर या कंपन्यांनी एका महिन्याच्या आत कायमस्वरूपी परवान्यांसाठी अर्ज करावा. या अटीवर ही मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्येक राईडसाठी १.५ किमीसाठी किमान भाडे ₹ १५ इतके निश्चित केले आहे. म्हणजे. एका किमीसाठी १० रूपये इतके भाडे असेल. Cheapest transport option in Mumbai today

मागील दोन महिन्यांत मुंबईमध्ये बाईक टॅक्सी चालविण्यासाठी वाहतूक विभागाला ४ अर्ज मिळाले होते. त्यापैकी ओला, उबर आणि रॅपिडो यांना मान्यता मिळाली आहे. तर चौथ्या कंपनीला फटका बसला आहे. स्मार्ट-राईडला बाईक टॅक्सी चालविण्यासाठी आवश्यक अटी आणि शर्ती पूर्ण करण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांना प्राधिकरणाने डावलले. नवीन महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम २०२५ राज्य सरकारने सरकारी ठराव (GR) द्वारे लागू केले.

ई-बाईकसाठी प्रति १.५ किमीसाठी १५ रूपये दर निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर उर्वरित प्रवासासाठी प्रवाशांकडून प्रति किमी १०.२७ रुपये आकारले जातील. राज्य परिवहन सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखालील एसटीएने १८ ऑगस्ट रोजी हा निर्णय घेतला होता.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्राधिकरण एक वर्षानंतर बाईक टॅक्सीच्या भाड्यांचा आढावा घेण्याचा विचार करत आहे. हे नवीन बाईक टॅक्सीचे भाडे हे काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या किमान भाड्यापेक्षा खूपच कमी आहे. मुंबईत प्रवाशांना काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी किमान ₹ 31 आणि ऑटोरिक्षांसाठी ₹ 26 भाडे द्यावे लागते.

बाईक टॅक्सीचा महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. एक लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये बाईक टॅक्सीसाठी राज्य सरकारने धोऱण जाहीर केले होते. नव्या धोरणांनुसार, एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरात बाईक टॅक्सी सुरू होणार आहे. कमी भाड्यामध्ये प्रवास करता येणार आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील लाखो लोकांना होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya Rumoured Girlfriend : हार्दिकच्या आयुष्यात स्टायलिश अभिनेत्रीची एन्ट्री? कोण आहे पंड्याची नवी गर्लफ्रेंड?

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी, सुप्रीम कोर्टाने दिली शेवटची मुदतवाढ

Jui Gadkari: चांद तू नभातला...

Maharashtra Live News Update: ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालय

Operation Sindoor: भारतीय हवाई हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरचं अख्ख कुटुंब खल्लास, Video viral

SCROLL FOR NEXT