मिलिंद एकबोटे, कालिचरण बाबा विरोधात पुण्यात गुन्हा दाखल - Saam Tv
मुंबई/पुणे

मिलिंद एकबोटे, कालिचरण महाराज विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे तसेच वादग्रस्त कालिचरण बाबा विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे : धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे तसेच वादग्रस्त कालिचरण महाराज यांच्या विरुद्ध पुण्यात (Pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Offence registered against Milind Ekbote Kalicharan Maharaj in Pune)

मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाच्या जातीय भावना दुखविल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडी संघटक कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह त्यांचे बंधू नंदकिशोर आणि कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांच्यासह सहा जणांविरोधात खडक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे. पोलीस (Police) नाईक सोमनाथ ढगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

मिलींद रमाकांत एकबोटे (कार्याध्यक्ष - समस्त हिंदु आघाडी संघटना शिवाजी नगर) मोहनराव शेटे, दीपक बाबुलाल नागपुरे (सामाजीक कार्यकर्ता) कालीचरण महाराज (रा. अकोला ) कॅप्टन दिगेंद्रकुमार ( रा. राजस्थान ) नंदकिशोर रमाकांत एकबोटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ही घटना १९ डिसेंबरला नातुबाग मैदान, शुक्रवार पेठ याठिकाणी घडली. या घटनेची व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपची पडताळणी करुन मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सर्व हिंदू संघटनांच्या वतीने रौप्यमहोत्सवी शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला होता. त्यात मिलिंद एकबोटे, कालिचरण महाराज यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावणारी भाषणे केली होती.

"अहिंसा परमो धर्मः या भगवद्गीतेतील अर्धवचनाचा दुष्प्रचार करुन हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजण्यात आले आहेत. इस्लाम आणि ख्रिश्चन हे धर्म नाहीत . सनातन हिंदू हा एकच धर्म आहे. ख्रिश्चन आणि इस्लाम हे बनवलेले कायदे आहेत. सनातन हिंदू धर्म हा मोक्ष प्राप्तिचा एकमेव मार्ग आहे. दुष्टान् हिंसयति इति हिंदू." असे वक्तव्य कालिचरण महाराज याने केले होते.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

BMC Elections : मुंबईसाठी एकनाथ शिंदेंचा ठाणे पॅटर्न, BMC जिंकण्यासाठी शिवसेनेनं काय आखला प्लान? | VIDEO

Maharashtra Flood : पुराने होत्याचं नव्हतं केलं, २ वर्षांची मुलगी अन् १० वर्षांचा मुलगा गेला वाहून, संभाजीनगरवर शोककळा

Mumbai Crime : स्विमिंग पूलमध्ये अल्पवयीन २ मुलींवर लैंगिक अत्याचार, दादरमधील धक्कादायक घटना

Garba Viral Video: आईचा स्वॅगच भारी! २ वर्षाच्या लेकराला पाठीवर घेऊन खेळला गरबा; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT