Narendra Modi Dehu Tour ज्ञानेश्वर हिंगोलीकर
मुंबई/पुणे

मोदींसाठी बनवलेल्या पगडीवर आक्षेप; पगडीवरील अभंगाच्या 'त्या' ओळी बदलल्या

पंतप्रधानांच्या हस्ते उद्या जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवार १४ जून रोजी देहूत येणार असून पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पंतप्रधान देहू (Dehu) नगरित येण्याआधीच त्यांचा हा दौरा काही कारणांमुळे वादात सापडला होता. कालचं राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी पिंपरी-चिंचवड भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनवर आक्षेप घेतला होता.

भाजपकडून मोदींच्या (Narendra Modi) स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरती विठ्ठलाच्या फोटोपेक्षा मोदींचा फोटो हा मोठा लावण्यात आल्यामुळे तो विठ्ठल भक्तांचा आणि वारकरी सांप्रदायाचा अपमान असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून (NCP) करण्यात आला होता.

हे देखील पाहा -

तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींसाठी बनवलेली पगडीवर लिहीलेल्या अभंगाच्या ओळींवर देखील आक्षेप घेतल्याने आता त्यातील अभंगाच्या ओळी (पद) बदलल्या आहेत.

‘भले तरी देवू कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी।।‘ ह्या ओळी अगोदर लिहीलेल्या होत्या तर आता ‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ‘ या ओळी लिहील्या आहेत. त्यामुळे मोदी देहूत यायच्या आधीच या दौऱ्याची या ना त्या कारणाने चांगलाच चर्चेत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवार गटात मोठा फेरबदल होणार; महिला अध्यक्ष बदलणार, नावही ठरलं

Papaya Combination: पपईसोबत 'हे' ५ पदार्थ खाणे टाळाच, कॉम्बिनेशन ठरू शकते घातक

मच्छिमारांना मिळणार थेट 20-22 हजार रुपये; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल

लालबाग मंडळाची VIP संस्कृती पुन्हा वादात, भाविकांना धक्काबुक्की, व्हीआयपींना लोटांगण

SCROLL FOR NEXT