BMC : मुंबईत शिवसेना नगरसेवकांची संख्या वाढली; भाजपचं नगरसेवकपद रद्द Saam TV
मुंबई/पुणे

BMC : मुंबईत शिवसेना नगरसेवकांची संख्या वाढली; भाजपचं नगरसेवकपद रद्द

प्रभाग क्रमांक 159 मधून 2017 ला भाजपचे नगरसेवक निवडून आले होते , तर शिवसेनेच्या (Shivsena) नगरसेवकाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भाजप नगरसेवक प्रकाश मोरे यांचं नगरसेवकपद रद्द करण्याचे लघुवाद न्यायालयाने आदेश त्यामुळे दिले असून याच ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळणाऱ्या उमदेवराला नगरसेवक पद देण्याचे महापालिकाला (BMC) न्यायालयाने आदेश दिले आहेत.

प्रभाग क्रमांक 159 मधून 2017 ला भाजपचे (BJP) प्रकाश मोरे निवडून आले होते , तर शिवसेनेच्या (Shivsena) कोमल जामसांडेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती मात्र प्रकाश मोरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती लपवल्याची तक्रार कोमल जामसांडेकर यांनी केली होती आणि त्यांच्या याच तक्रारीवर निर्णय देताना लघुवाद न्यायालयाने प्रकाश मोरे यांचं नगरसेवक पद रद्द केलं आहे.

दरम्यान, सध्या मोरे यांच्या वकिलाने या आदेशाविरोधात वेळ मागून घेतला आहे. तसंच कोमल यांना नगरसेवक पद मिळालं तरी आता पालिका निवडणूका काही दिवसातच होणार असल्याने त्यांना नगरसेवक कालावधी अवघ्या काही दिवसांचा मिळणार आहे. कारण 7 मार्चला सभागृहाचा कार्यकाळ संपणार असून पालिकेवर प्रशासक नेमला जाणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss: दररोज सकाळी 'हे' काम केल्याने वजन होईल लवकर कमी, आठवडाभर करुन पाहा हे उपाय

Maharashtra Live News Update : अकोला महापालिकेत महायुती होणार?

Mumbai-pune : मुंबईहून पुणे फक्त ९० मिनिटात अन् बंगळुरू ५ तासात, नव्या एक्सप्रेसची A टू Z माहिती

Accident : ट्रकने दुचाकीला उडवले, बायकोच्या डोळ्यासमोर नवऱ्याचा तडफडून मृत्यू

Flax Seeds Ladoo Recipe : फक्त १५ मिनिटांत बनतील पौष्टिक जवसाचे लाडू, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT